बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उंदीर आणि डासांची संख्या वाढली आहे त्यामुळे याचा त्रास तेथील कर्मचाऱ्यांना होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात वाढलेल्या उंदरांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि डास निर्मूलनासाठी निविदा काढण्यात आली होती. त्यानुसार या कामासाठी तिघांनी निविदा सादर केल्या आहेत.
डी सी ऑफिस मध्ये त्रास लक्षात घेत उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आली आहे. तसेच कार्यालयात डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे, कर्मचाऱ्यांना डासांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. त्याप्रमाणे तिघांकडून निविदा सादर करण्यात आली आहे. या निविदांवर लवकरच निर्णय जात असल्याने अनेकवेळा कामात व्यत्यय होणार आहे.
डी सी ऑफिस मध्ये उंदरांकडून महत्त्वाच्या
फायली कुरतडण्यासह संगणकांच्या वायर्स तोडल्या आहेत त्यामुळे कामात व्यस्त्व्य
निर्माण होत आहे. भविष्यात याचा धोका लक्षात घेता उंदरांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयातही उंदिरांची संख्या अधिक आहे तिथेही मोठ्या प्रमाणात उंदीर झाले होते.
तेथेही कागदपत्रे कुरतडली जात होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी नितेश पाटील प्रादेशिक आयुक्त म्हणून प्रभारी असताना उंदरांचा बंदोवस्त करण्यासाठी निविदा मागवली होती. ठेकेदार निश्चित करण्यात आला.
उंदीर पकडण्यात आल्यामुळे त्याठिकाणाचा उपद्रव कमी झाला आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयातील उंदीर पकडण्यात येणार आहेत.