Sunday, September 8, 2024

/

.. अखेर कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला यश

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील शास्त्रीनगर येथे आढळून आलेल्या कोल्ह्याला पकडण्यात वनखात्याला अखेर यश आले आहे. या कामी त्यांना फेसबुक फ्रेंड्स सर्कल व श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले असून कोल्ह्याने चावा घेतल्याने एक कार्यकर्ता किरकोळ जखमी झाला आहे.

शास्त्रीनगर सहावा क्रॉस येथे आज सोमवारी सकाळी एक कोल्हा वावरताना आढळून आला होता. याबाबतची माहिती मिळताच वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ शास्त्रीनगर येथे दाखल होऊन शोध मोहीम हाती घेतली होती. वन खात्याच्या या मोहिमेमध्ये फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांचाही सहभाग होता.

या सर्वांनी अल्पावधीत मोठ्या प्रयासाने जंगलातून शहरात शास्त्रीनगरमध्ये दाखल झालेल्या कोल्ह्याला अखेर जेरबंद केले आहे. कोल्ह्याला पकडते वेळी त्याने चावा घेतल्यामुळे रोहन शहापूरकर हा कार्यकर्ता मात्र किरकोळ जखमी झाला आहे. जेरबंद केलेल्या कोल्ह्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वन खात्याच्या अधिकारी स्वतः सोबत घेऊन गेले आहेत.Fox

वनखात्याच्या कोल्ह्याला पकडण्याच्या मोहिमेत संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, सौरभ सावंत, नारू निलजकर आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

आज सकाळी शास्त्रीनगर येथे वावरणाऱ्या कोल्ह्याने कोणालाही इजा केली नसली तरी त्याला पकडण्यात येताच नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.