कोणतेही सरकारी कार्यालय अथवा खाजगी कार्यालयात वीज पुरवठा खंडित असेल तर जनरेटर लावून काम केले जाते. अनेक शासकीय कार्यालयांमध्ये असे होत असते. मात्र बेळगावतीलं हे एक असे शासकीय कार्यालय आहे, जिथे विद्युत पुरवठा नाही वायरिंगचे काम बिघाड झाले म्हणून कार्यालयाचे कामकाजच बंद ठेवण्यात आले आहे.
शासकीय कार्यालयांसाठी लाजिरवाणा असलेला हा अजब प्रकार बेळगाव दक्षिणच्या उपनोंदणी कार्यालयाच्या ठिकाणी पहायला मिळत आहे. या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी विद्युत पुरवठा नसल्यामुळे आज कार्यालयातील नोंदणी वगैरे कामकाज होणार नाही असा फलक लावण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक लोकांसह परगावहून येणाऱ्या अनेक लोकांच्या कामाचा खोळंबा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला आहे.
शुक्रवार विद्युत पुरवठा मुळे शनिवारी महिन्याचा दुसरा शनिवार म्हणून तर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सतत तीन दिवस हे कार्यालय बंद असणार आहे त्याशिवाय सोमवारी १४ आगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाची पूर्व तयारी म्हणून कमी काम 15 रोजी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी त्यामुळे जवळपास पाच दिवसांनी सरकारी कार्यालये पूर्ववत होणार आहेत.
खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी पुणे, मुंबई, बेंगलोर आदी परगावाहून दूरवरून लोक बेळगावमध्ये येत असतात. या लोकांना उपनोंदणी कार्यालय बंद असल्याचा फटका बसत आहे.
तसेच शासनाच्या जबाबदार कार्यालयांपैकी एक असलेल्या बेळगाव दक्षिणमधील उपनोंदणी कार्यालयाकडे जनरेटर असू नये किंवा पर्यायी व्यवस्था असू नये. निव्वळ वीज पुरवठा नसल्यामुळे वायरिंग खराब झाल्याने संपूर्ण कार्यालय बंद ठेवण्याच्या या प्रकाराबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.