बेळगाव जिल्हा न्यायालय आवारातील एका निवडक इमारतीमध्ये राज्य ग्राहक आयोगाची स्थापना करावी आणि अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोग नियमित करण्याद्वारे त्याच्यासाठी वेगळी इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्राहक संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी ॲड. दऱ्याप्पा बैलगे, ॲड. रुपेश लातूर, ॲड. रोहित लातूर, ॲड. अनिल शिंदे आदी उपस्थित होते.