बेळगाव लाईव्ह:मंदिर, दर्गा आणि इतर प्रार्थनास्थळांत रोज मोठ्या प्रमाणात फुलांचा कचरा जमा होतो. अशोकनगर येथील होलसेल फूल बाजारातही कचरा साचून राहतो. त्यामुळे या कचर्यापासून सुगंधीत अगरबत्ती तयार करण्याचा महापालिकेला प्रयत्न आहे.
आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी फुलांच्या कचर्यापासून अगरबत्ती बनविण्यास मान्यता दिली आहे. त्यामुणे लवकरच यावर कार्यवाही होणार आहे. फुलांच्या कचर्याचा पुनर्रवापर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कामासाठी स्वयंसेवी संस्थांना आवाहन करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून फुलांच्या कचर्यापासून अगरबत्ती तयार करण्याचा प्रस्ताव होता. आता आयुक्त दुडगुंटी यांनी यावर निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेळगावकरांना लवकरच सुगंधीत अगरबत्ती मिळणार आहेत.
शहरातील कचर्याबाबत प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने विविध प्रकल्प आखले आहेत. शहरातील विविध भागांत कचरा प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
त्यातच आता फुलांच्या कचर्यापासून अगरबत्ती तयार करण्यात येणार आहे. या अभिनव प्रयोगाचे विशेष कौतुक होत आहे.