Saturday, January 4, 2025

/

अपोजिशन लीडर डोणीजी, आपकी जिम्मेदारी बढी…

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेतील लोकनियुक्त सभागृहात सर्वात अनुभवी नगरसेवक म्हणून हॅटट्रिक करत निवडून आलेले उर्दू भाषिक काँग्रेसचे नगरसेवक मुझम्मील डोणी यांची बेळगाव मनपाच्या विरोधी पक्ष नेते पदी निवड झाली आहे. मनपात सत्तारूढ गट नेते (राजशेखर) डोणी तर विरोधी गट नेते (मुझम्मील) डोणी अशी निवड झाली आहे.

बेळगाव महापालिकेला सहा महिन्यांनी विरोधी गटनेता मिळाला आहे. बुधवारी (दिनांक 16) झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी मुझमम्मील डोणी यांचे नाव विरोधी गटनेता पदासाठी घोषित करण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचे लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आले. महापौर, उपमहापौर आणि सत्ताधारी गटनेते पदाची घोषणा करण्यात आली. पण विरोधी पक्ष नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नव्हती.

विरोधी गटनेते पदासाठी मुझम्मील डोणी यांच्यासह अजीम पटवेगार यांचे नाव चर्चेत होते. पण बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी डोणी यांच्या नावाची घोषणा केली. डोणी यांच्या नावाची महापौर शोभा सोमानाचे माहिती देण्यात आली. त्यानंतर सभागृहात डोणी यांच्या नावाची विरोधी गटनेता म्हणून घोषणा करण्यात आली.

मुझम्मील डोणी यांची मनपात नगरसेवक म्हणून ही तिसरी टर्म आहे पहिल्या एक टर्म मध्ये ते सभागृहात क्वचितच बोलले असतील मात्र दुसऱ्या टर्म मध्ये तात्कालीन आमदार फिरोज सेठ यांच्या सोबत मनपात असायचे एखाद दुसरी वेळ त्यांनी सभागृहात मुद्दे मांडले असावेत मात्र या तिसऱ्या वेळी खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष नेते पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे जरी सभागृहात बोलण्याचा अनुभव कमी असला तरी त्यांची आता खरी कसोटी लागणार आहे.Doni

विरोधी गटात काँग्रेसचे जास्त नगरसेवक असले तरी समिती, एम आय एम आणि अपक्ष नगरसेवकां सोबत सर्वांना घेऊन काम करावे लागणार आहे

विरोधी पक्ष नेते पद सक्षम पणें हाताळण्यासाठी सर्वप्रथम त्यांना जनतेच्या प्रश्नांची नाळ जुळवून घ्यावी लागणार आहे विशेषता संपूर्ण शहरातील मूलभूत नागरी समस्या सोडवण्यासाठी सभागृहात आवाज उठवावा लागणार आहे.सत्ताधारी पक्षाच्या कानपिचक्या करत लोकांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी जोरदारपणें भूमिका मांडावी लागणार आहे. इतकेच काय तर उत्तरचे आमदार राजू सेठ आणि पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कायम संपर्कात राहून समन्वय साधत अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्यावी लागतील किंबहुना कामचुकार करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत .

राज्यात काँग्रेसचे सरकार असल्याचा फायदा मनपात कसा करून घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे मनपातील सत्ताधारी भाजपला वरचेवर सभागृहात कोंडीत पकडण्यासाठी विशेष रणनीती राबवावी लागणार आहे या सगळ्या साठी मुझम्मील यांना तयारी करावी लागणार आहे.

विशेष म्हणजे या अगोदर मनपात यशस्वी विरोधी पक्ष नेते म्हणून काम केलेल्या माजी नगरसेवकांकडून किंवा माजी महापौर यांच्या कडून मार्गदर्शन घेऊन कामकाज केल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा  कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.एकूणच डोणी यांना स्वतःला आगामी काळात सिद्ध करून दाखवावे लागनार आहे.

भारतीय लोकशाहीत, लोकशाही बळकटीसाठी, सत्ताधारी पक्षापेक्षा विरोधी पक्ष बळकट असणे गरजेचे आहे. विरोधी पक्ष बळकट असल्यास नक्कीच लोकशाही बळकट होते म्हणून विरोधी पक्ष नेत्याला राजकारणात महत्त्व आहे. बेळगाव महापालिकेतही विरोधी पक्ष गट नेता देखील सत्ताधाऱ्या इतकाच सक्षम असायला हवा ही देखील, सदृढ लोकशाहीची लक्षणे आहेत त्यासाठीच मुझम्मील डोणी यांना शुभेच्छा!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.