बेळगाव लाईव्ह :पावसाळ्यात विद्युत खांबाजवळ जाऊ नये किंवा विद्युत खांबाला कोणीही स्पर्श करू नये याबाबत बेळगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी विद्युत खांबाला जनजागृती फलक बसून सदाशिवनगर येथे जनजागृती केली आहे.
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे विद्युत खांबांच्या तारा कोसळून शेतकरी दांपत्य जागीच ठार झाल्याची घटना रविवारी घडल्यानंतर पावसाळ्यात पुन्हा विद्युत खांबांच्या तारा आणि खांबे हबप्रश्न उपस्थित झाला आहे यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून सामाजिक जनजागृती करण्यात आली आहे.
सदाशिव नगर शेवटचा क्रॉस येथे फलक बसवण्यात आला आहे. पावसाळ्यात विजेच्या धक्क्यापासून सुरक्षिततेबाबत काळजी घेण्याचे आवाहन करत विजेच्या खांबाला हात लावू नये, ओल्या हाताने स्विचला(बटणला) हात लावू नये, जनावरांना विजेच्या खांबाजवळ बांधू नये , मुलांना झाडांच्या खाली थांबू नये आणि विजेच्या खांबापासून दूर ठेवावे. जमिनीत उघडलेल्या केबलच्या तारांपासून दूर राहा,
जर कोणतीही तार तुटली आणि ती जमिनीत पडली तर त्याला हात लावू नका अन्यथा लाकडी काठ्या वापरा, कारण लाकडापासून विजेपासून शॉक लागत नाही. (कारण – wood is the best conductor of electricity) पावसाळ्यात विजेचा शॉक लागण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आपण सर्वांनी सुरक्षिततेसाठी खबरदारी घेतली पाहिजे. विद्युत खांबावर इंटरनेट केबलच्या वायर्स, बांधेल आहे त्या इंटरनेट केबल वायरची योग्य देखभाल होत नाही. असे फलक लावून जनजागृती करण्यात आली.