Sunday, July 14, 2024

/

सौजन्या खून प्रकरणी मोर्चा निदर्शन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :धर्मस्थळ तालुक्यातील बेळतंगडी येथील सौजन्या या विद्यार्थिनीच्या अत्याचार व खून प्रकरणातील खऱ्या आरोपींना कठोर शासन केले जावे, या मागणीसाठी आज जिल्ह्यातील बेळगाव प्रगतीपर संघटना आंदोलन मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.

बेळगाव प्रगतीपर संघटना आंदोलन मंचाच्या नेतृत्वाखाली आज बुधवारी सकाळी राणी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन आवारात जिल्ह्यातील 25 प्रगतीपर आंदोलन संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित झाल्या होत्या. या सर्वांनी नराधमाने अत्याचार करून ठार मारलेल्या सौजन्या या विद्यार्थिनीला मरणोत्तर न्याय मिळावा अशी मागणी करत साहित्य भवन येथून जिल्हाधिकारी (डीसी) कार्यालयावर मोर्चा काढला.

आपल्या मागणीचे सौजन्याच्या छायाचित्रासह असलेले फलक आता धरून घोषणा देत निघालेल्या मोर्चातील महिला व युवती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याद्वारे या मोर्चाची सांगता झाली.

बेळतंगडी (ता. धर्मस्थळ) येथील एसडीएम कॉलेजमधील विद्यार्थिनी सौजन्या हिचा गेल्या 2021 मध्ये अत्याचार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष राव नावाच्या संशयित आरोपीची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. सौजन्या अत्याचार व खून प्रकरण प्रारंभी सीओडी आणि त्यानंतर सीबीआयकडे सोपविण्यात आले होते.Soujanya

मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या प्रकरणातील साक्षी पुरावे नष्ट झाले आहेत. परिणामी संशयित आरोपीची न्यायालयामध्ये निर्दोष मुक्तता झाली आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी.

याखेरीस सौजन्य अत्याचार व खून प्रकरण एसआयटी अर्थात विशेष तपास पथकाकडे सोपवले जावे आणि खऱ्या आरोपींना गजाआड करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.