Tuesday, January 7, 2025

/

सर्च ऑपरेशन की सुरक्षा आढावा भेट?

 belgaum

बेळगाव लाईव्ह: केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन गेल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बेळगावच्या हिंडलगा जेलला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने पुन्हा एकदा बेळगावचे कारागृह चर्चेत आले आहे.

एकीकडे पोलीस आयुक्तांनी जेल मध्ये सर्च ऑपरेशन राबवली असल्याची जोरदार चर्चा माध्यमातून रंगली असताना भेट देऊन कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पोलिस आयुक्तांनी कारागृहात अंतर्गत सुरक्षा बैठक घेतली असल्याचे स्पष्ट केले मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या या जेलला दिलेल्या अचानक भेटीमुळे छापा टाकून सर्च ऑपरेशन राबविण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली होती.

कारागृहात बंदिस्त असलेल्या कुख्यात कैद्याकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील कार्यालयाला फोन करुन खंडणीसाठी धमकाविल्याने हिंडलगा मध्यवर्ती कारागृह गेल्या काही महिन्यापासून देशभर चर्चेत आले आहे.एकीकडे या प्रकरणाचा तपास (एनआयए) राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे. त्याशिवाय कारागृहातील फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण करून कैदी प्रसार माध्यमांना पुरवत आहेत.

तसेच कैद्यामध्ये टोळी युध्दातून होणारे हल्ले, अंमली पदार्थांची रेलचेल, पैसे दिल्यास मोबाईलचा देखील पुरवठा केला जात असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे जेलची प्रतिमा देखील मलिन झाली आहे यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले की काय? अशी जोरदार चर्चा सुरू होती.Cop jail visit

याशिवाय यापूर्वी देखील अनेक वेळा पोलिसांनी कारागृहावर छापेमारी करून मोबाईल, सिम कार्ड, चार्जर आदी प्रकारचे साहित्य जप्त केले आहे. त्यातच आज पोलिस आयुक्त एस. एन. सिध्दरामप्पा, पोलिस उपायुक्त शेखर एच. टी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारागृहाला अचानक भेट दिली अशी माहिती पोलिसांनी दिली.

जेल पोलीस आयुक्तांनी भेट दिल्याची माहिती समजतात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी कारागृहाबाहेर गर्दी केली. मात्र, कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कारागृहात तपासणीसाठी आलो नसून अंतर्गत सुरक्षेचा आढावा बैठकीसाठी आपण आलो असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, कारागृहावर छापा टाकून सर्च ऑपरेशन राबविण्यात आल्याची चर्चा शहरात दिवसभर सुरू होती. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी पोलिस आयुक्तांना कारागृहातील सद्य परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.