बेळगाव लाईव्ह विशेष :मराठी मतांचा जोगवा मागणाऱ्या निवडणुका आल्या की मराठी माणसांचे प्रेम ऊतू जाणाऱ्या मराठी विरोधी राजकारण्यांना मराठीची कावीळ वेळोवेळी होते आणि त्यांची लक्षण वेगवेगळ्या मार्गाने दिसू लागतात यावेळी समितीच्या नगरसेवकाना बैठकीची नोटीस घरावर चिकटून मराठी विरोधाचा नवा फंडा दाखवून दिला आहे.
नोटीस घरावर चिकटवणे एका वेगळ्या परिस्थितीत मार्ग अवलंबला जातो पण मराठी नगरसेवकांच्या घरावर नोटिसा चिकटवण्याच्या प्रकाराने मराठीच गायब आहे असा दाखवण्याचा प्रकार आहे का? अश्या विचारांनी मराठी जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना मराठी विरोधी असे धोरण स्वीकारणाऱ्या मराठी विरोधी लोकांनां कोणती जागा दाखवायची हे माणूस नक्की करेल त्यात काही शंका नाही.
महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या कोणत्याही बैठकीची नोटीस किंवा माहिती नगरसेवकांना प्रत्यक्षात भेटून किंवा संदेशा द्वारे दिली जात असते मात्र बेळगाव महापालिकेने केवळ मराठीत कागदपत्रांची मागणी केली म्हणून समिती समिती नगरसेवकांच्या घरावर नोटीस चिकटवण्याचा प्रकार केला आहे या अजब कारभाराचा घटनेचा मराठी जनतेतून निषेध व्यक्त होत आहे.
कुणाचीही संपत्ती जप्त करायची असल्यास किंवा त्यांना वादा संबंधी नोटीस द्यायची असल्यास संबधित मालमत्तेवर नोटीस चिकटवली जाते मात्र इंग्लिश किंवा कन्नड मधून नोटीस घेण्यास नकार दिल्याने बेळगावच्या तीन समिती नगरसेवकांच्या घरावर चक्क चिकटवण्यात आली आहे.
भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अधिकारानुसार मराठी नगरसेवकांनी मराठीतून नोटीस मिळावी कानडी इंग्लिश सोबत मराठीतूनही कामकाज चालावे अशी मागणी रास्त होती मात्र अश्या पद्धतीने नोटीस चिकटवणे निषेधाचा प्रकार आहे.
बेळगाव महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे महापौर उपमहापौर या भाजपच्या आहेत तर उत्तरचे आमदार आणि पालक मंत्री काँग्रेसचे आहेत.सदर नोटीस कुणी चिकटवली याची चौकशी व्हावी या शिवाय महापौर शोभा सोमणाचे उपमहापौर रेश्मा पाटील मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी आणि पालक मंत्री सतीश जारकीहोळी याचे उत्तर द्यावे अशी मागणी केली जात आहे.
पालकमंत्री म्हणून सतीश जारकीहोळी यांचीही जबाबदारी आहे ते मनपाच्या अनेक बैठकांना हजर असतात त्यांच्याच नेतृत्वाखाली बैठकी सुरू असतात.घटने नुसार मागणी करणाऱ्यावर अशी वागणूक मिळत असेल तर कसे? तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे आहात त्यामुळे मनपाच्या या कारभारावर त्यांनी मराठी नगरसेवकांवर केलेल्या या प्रकारावर व्यक्त होणे गरजेचे आहे.