Thursday, November 28, 2024

/

मराठी नगरसेविकेच्या घरावर चिकटवली कन्नड मधील बैठकीची नोटीस

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मराठीतून कागदपत्रे देण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये नोटीस बजावल्यामुळे म. ए. समितीच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेची नोटीस स्वीकारली नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने नगरसेवकांच्या घरांवर सभेची नोटीस चिकटवून आडमुठेपणा दाखवला आहे. या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जुलै महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत महापालिकेची कागदपत्रे इतर भाषेसह मराठी भाषेतूनही देण्याचा ठराव संमत केला होता. पण महिनाभरातच महापालिका प्रशासनाने मराठीच्या ठरावाला केराची टोपली दाखवली आहे. १६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेची नोटीस फक्त कन्नड आणि इंग्रजीमध्ये काढली असून मराठी नोटिसीला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला.

महापालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा १६ ऑगस्ट रोजी होणार आहे. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा नगरसेवकांना नोटीस पाठवण्यात आली. पण ही नोटीस केवळ कन्नड आणि इंग्रजीमध्ये आहे. गेल्याच सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतही महापालिकेचे कामकाज चालेल, असा ठराव संमत करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेने मराठी भाषेतही कागदपत्रे द्यावीत. मराठी कागदपत्रावरून काही जण विनाकारण राजकारण करत आहेत, असा

आरोप केला होता. त्यानंतर महापौर शोभा सोमणाचे यांनी यापुढील महापालिकेचे कामकाजासाठी तिन्ही भाषेत कागदपत्रे देण्यात येतील, असा ठराव केला होता.

पण या घटनेला महिना होण्याआधीच बगल देण्यात आली आहे. मराठी भाषेतून कागदपत्रे देण्याच्या ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकातून तीव्र संताप व्यक्त होत असून या विषयावर सर्वसाधारण सभेत पुन्हा वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.Marathi corporator

शुक्रवारी (दि. ११) म. ए. समितीच्या सर्वच सर्वसाधारण सभेची कन्नडमधील नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे शनिवारी (दि. १२)महापालिकेत त्रिभाषा धोरणाचा अवलंब करण्याचा ठराव याआधीच झाला आहे. गेल्या सर्वसाधारण सभेत मराठीतूनही कागदपत्रे देण्याचा ठराव भाजपने केला आहे. असे असले तरी मराठीला बगल देण्यात आल्यामुळे याविरोधात सत्ताधारी भाजप, विरोधी काँग्रेसमधील मराठी नगरसेवक आवाज उठवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घराच्या भिंतीवर नोटीस चिकटवली आहे. या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. भांदुर गल्लीतील समितीच्या नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या घरावर नोटीस चिकटवण्यात आली आहे याचा निषेध व्यक्त करत भातकांडे यांनी बैठकीत निषेध व्यक्त करण्याचा इशारा दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.