बेळगावातील यतीन्द्रानंद स्टार लाईन बॅडमिंटन अकॅडमीच्या महांतेशनगर येथील नव्या भव्य इनडोअर शटल बॅडमिंटन सुविधा अर्थात केंद्राचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
स्टारलाइन बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक यतींद्रानंद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडाप्रेमी अशोक पाटील, आशा घाटगे, राज घाटगे, प्रेरणा घाटगे आणि लक्ष्मी इंचल उपस्थित होते. त्याचप्रमाणे सन्माननीय अतिथी म्हणून अमित घाटगे, सागर घाटगे, मुर्गेश धपलापूर, आनंद हवण्णावर, प्रशांत कुलकर्णी, कुणाल शहा, इर्शाद दखनी आणि तीमिर अलवारे हे हजर होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून नव्या बॅडमिंटन केंद्राचे उद्घाटन झाले.
त्यानंतर प्रमुख पाहुणे व सन्माननीय पाहुण्यांचा परिचय करून देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत नृत्य अन्वी कुलकर्णी हिने सादर केले. ज्यानंतर स्टारलाइन अकादमीचे जोसेफ जी यांनी केंद्राची माहिती दिली. प्रमुख पाहुणे राज घागटे, लक्ष्मी इंचल आणि आनंद हवण्णावर यांनी यावेळी समायोजित विचार व्यक्त करून अकादमीला शुभेच्छा दिल्या. यावेळी पाहुण्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आली. शेवटी स्टारलाइन बॅडमिंटन अकादमीचे संस्थापक यतींद्रानंद देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले आणि खेळण्यासाठी बॅडमिंटन कोर्ट खुले झाल्याची अधिकृत घोषणा केली. याप्रसंगी शहरातील मान्यवर निमंत्रितांसह बहुसंख्य बॅडमिंटनपटू आणि क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
यतीन्द्रानंद स्टार लाईन बॅडमिंटन अकॅडमीचे महांतेशनगर येथील नवे भव्य इनडोअर शटल बॅडमिंटन केंद्र हे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. येथील सुविधा आणि मार्गदर्शन खेळाडूंची क्षमता वाढवून त्यांच्या खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी आश्वासक आहेत. प्रशस्त मल्टिपल बॅडमिंटन कोर्ट, प्रगत प्रकाश आणि आधुनिक उत्कृष्ट फ्लोअरिंग, इनडोअर हवामान नियंत्रण सुविधा ही या केंद्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. खेळाडू आणि प्रशिक्षणार्थींच्या सोयीसाठी या ठिकाणी अल्पोपहाराचे क्षेत्र आणि प्रसाधनगृहे यासारख्या सुविधांचाही आहेत.
यतींद्रानंद स्टारलाइन अकादमी तळागाळापासून व्यावसायिक स्पर्धांपर्यंत सर्व स्तरांवर खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. नवे इनडोअर शटल बॅडमिंटन केंद्राचे उदघाटन हे खेळांची सुलभता वाढवणे, क्रीडापटूंना प्रोत्साहनार्थ आणि खेळासाठी उत्कृष्ट पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने निर्माण करण्यात आले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी यतींद्रानंद स्टारलाइन अकादमी [9611661348] येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.