बेळगाव लाईव्ह :श्रावण महिन्यात सर्वात पहिला येणारा सण म्हणजे नाग पंचमी होय. बेळगाव तालुक्यातील गावोगावी आपापल्या पद्धतीने हा सण उत्साहात साजरा केला जातो.
“हर हर नमुस करा श्रावण महिन्याचा जीत नागोबा खरा”. कडाडणाऱ्या डमरू बरोबर गारुडी रंगात येऊन नागाला खेळवण्याचे दृश्य गावोगावी दिसून येत होते, टोपलीत ठेवलेले नाग धामिन त्याला खुटयाला बांधलेले मुंगूस चमत्कारी दिसणारी बाहुली, कवटी आणि हाडे अश्या ह्याच्यात गारुडी आपला खेळ रंगवत जात असतो.
फुक मारून टोपिली तला नाग उभा केला की श्रध्देने हात जोडले जात असत आणि पुंगीच्या तालावर डोलणारा नाग आश्चर्य चकित करत असे आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे तरीही बेळगाव शहरा जवळील गावोगावी पारंपरिक पद्धतीने नाग पंचमी साजरी केली जाते.
बेळगाव शहरातील जुने बेळगाव इथल्या लक्ष्मी मंदिरातील या बातमीचा फोटो पाहिला की युवक शेतातील माती काळी आणून नाग बनवतात. नागाचा साचात नाग पूर्ती तयार करून नाग घरोघरी वितरीत केले जातात त्यानंतर घरी नाग आणून त्याची पूजा केली जाते .गावातील सुतार समाजाकडून काळ्या माती मध्ये नाग बनवण्याची परंपरा आजही अनेक गावात आहे. सुतार बंधूंना तांदूळ देऊन त्यांच्याकडून आळू किंवा भोपळ्याच्या पानातून नाग घरी आणला जातो.
नाग पंचमी रोजी लहान मुले मुली झोपाळे बांधून खेळण्याचीही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे आजही जर खेडे गावात गेला तर घरात झोपाळे बांधलेले चित्र आपल्याला पाहायला मिळते.
नाग पंचमी निमित्त विवाह झालेल्या मुली माहेरी येतात आणि आवडीने हा सण घरात साजरा होतो घरातील मंडळीकडून लाडू तंबिट लाह्या खाद्य पदार्थ बनवले जातात.अनेक गावातून नाग पंचमी निमित्त वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते
एकूणच श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येणारा हा सण अनेक खेळ आणि आनंद घेऊन येत असतो.