बेळगाव लाईव्ह:*माहेश्वरी युवा संघ आणि सखी मंडल तर्फे उद्या एक प्रेरणादायी व्याख्यान* बेळगाव -येथील श्री माहेश्वरी युवा संघ आणि माहेश्वरी सखी मंडळ यांच्या वतीने “जीवन जगण्याचा नवा अंदाज़(पद्धत)” या विषयावर नारी रत्न श्रीमती राजेश्वरिजी मोदी (राज दिदी) मुंबई यांचे एक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आजच्या भाग दौडीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला ताण तणाव येतो अशा ताणतणावामुळे लोकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे अशा परिस्थितीत राज दीदी या जीवनामध्ये बदल कसा आणावा, सकारात्मक विचारद्वारे आपल्या जीवनातील चढ-उतारावर कशाप्रकारे मात करावी याबद्दलची पूर्ण विवेचन करणार आहेत.
‘ जीवन जीने का नया अंदाज’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय असून त्याला अध्यात्माची जोड मिळाल्यामुळे एक वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे.
बेळगावात प्रथमच या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 20 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ ते साडेबारा या वेळात महात्मा गांधी भवन, कॉलेज रोड, बेळगाव येथे होणाऱ्या या व्याख्यानानंतर उपस्थितांची जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पास असणे गरजेचे आहे.
अधिक माहिती व पाससाठी सुनिता बंग-9590093577,
शिल्पी मालू- 99 016 75 5 77, अर्चना बजाज- 80 73 71 0 900 किंवा गौतम चिंडक -99 16 99 55 55 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.