Monday, December 30, 2024

/

111 “अग्निवीर” जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ

 belgaum

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेऊन देशसेवेसाठी सज्ज झालेल्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या 111 “अग्निवीर” जवानांच्या पहिल्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज शनिवारी सकाळी लष्करी दिमाखात पार पडला.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे आयोजित या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जूनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुराय उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अग्निरांनी वाद्य वृंदाच्या तालावर प्रमुख पाहुण्यांना शिस्तबद्ध संचलनाद्वारे मानवंदना दिल्यानंतर मेजर जनरल गुराय यांनी परेडची पाहणी केली.

त्यानंतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 111 अग्नीवीरांच्या पहिल्या तुकडीला कर्तव्य आणि देशसेवेची शपथ देवविण्यात आली. यावेळी अग्निविरांना उद्देशून केलेल्या आपल्या समायोचित भाषणात प्रमुख पाहुणे मेजर जनरल आर. एस. गुराय यांनी मराठा लाईट इन्फंट्रीचा समृद्ध वारसा आणि वैभवाची माहिती देताना भारतीय लष्कराची ही सर्वात जुनी इन्फंट्री रेजिमेंट असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे जवानांच्या जीवनातील शिस्त आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्वही त्यांनी विशद केले. मराठा रेजिमेंटल सेंटर येथे देण्यात आलेल्या प्रशिक्षणाबद्दल आत्मविश्वास व्यक्त करून युवा जवानांना त्याचा निश्चितपणे फायदा होईल.Mlirc agniveer

मराठा रेजिमेंटचा वैभवशाली इतिहास आणि भारतीय सेनेच्या परंपरेला आणखी नव्या उंचीवर घेऊन जाणे तुमचे दायित्व आहे असे सांगून तुम्हाला दिलेले प्रशिक्षण फक्त देश सेवेच्या चार वर्षासाठी नाही तर संपूर्ण जीवनभर एक उत्तम नागरिक बनण्यासाठी मदत करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दीक्षांत सोहळ्यानिमित्त अग्निविरांच्या प्रशिक्षणा दरम्यान उत्तम कामगिरी बजावलेल्या जवानांना पारितोषिके घेऊन गौरविण्यात आले. यावेळी ओव्हर ऑल बेस्ट अग्निविरासाठी असलेला नाईक यशवंत घाडगे पुरस्कार अग्नीवीर अक्षय धीरे याला प्रदान करण्यात आला.

सदर दीक्षांत सोहळ्याची सांगता प्रमुख पाहुणे मेजर जनरल आर. एस. गुराय यांच्या हस्ते मराठा सेंटर येथील शर्कत युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यातद्वारे झाली. अग्निवीर दीक्षांत सोहळ्यास लष्कराचे वरिष्ठ अधिकारी, निमंत्रित आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचे नातलग बहुसंख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.