बेळगाव जिल्ह्याचे मंत्रीपद भुषवलेले सध्या शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विधान परिषद सदस्य असलेल्या प्रकाश हुक्केरी यांना राज्य मंत्री स्तराचे पद मिळाले आहे.
हुक्केरी यांची कर्नाटक सरकारचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याशिवाय राज्यसभेचे माजी सदस्य राजीव गौड यांची योजना आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचा आदेश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बजावला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील प्रकाश हुक्केरी हे निष्ठावंत काँग्रेसचे नेते म्हणून कार्यरत आहेत दिल्लीचे राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांना न्याय मिळाला आहे.
या अगोदर दिल्लीचे विशेष प्रतिनिधी म्हणून भाजपच्या कार्यकाळात बेळगावचे शंकर गौडा पाटील यांना हे पद मिळाले होते आता बेळगाव जिल्ह्याला पुन्हा एकदा हे पद मिळाले आहे.