Saturday, November 23, 2024

/

गणेश उत्सवासाठी तयारी महापालिकेची तयारी कशी?

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचा गणेश उत्सव अजूनही एक महिना दूर असला तरी महापालिका प्रशासनाकडून या उत्सवाची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. दरवर्षी प्रमाणे बेळगाव महापालिका व्याप्तीतील 8 ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी करण्यात येणार आहे.

सोमवारी महापौर शोभा सोमणाचे उपमहापौर रेश्मा पाटील यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांनी शहरातील विविध विसर्जन तलावाना भेटी देऊन पाहणी केली.कपिलेश्वर नवीन आणि जुने तलाव, जक्किन होंड सह अनगोळ वडगाव जुने बेळगाव तलावांची पाहणी करून कश्या पद्धतीने विसर्जन व्यवस्था करता येईल याची माहिती घेतली.

बेळगाव मनपाच्या वतीने यंदाच्या गणेश उत्सवासाठी एक कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. यातून कपिलेश्वर नवीन जुने, जक्कीन होंड, जुने बेळगाव मजगाव अनगोळ आणि कणबर्गी असे आठ विसर्जन तलाव स्वच्छ केले जाणार आहेत त्यासाठी 44 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत या पंधरा दिवसात तलाव स्वच्छ करण्यासाठी शॉर्ट टर्म निविदा काढल्या आहेत. 28 ऑगष्ट रोजी हे टेंडर खुले केले जाणार आहेत.City corporation ganesh

या शिवाय गणेश विसर्जन मार्गावरील रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुझवण्याठी 40 लाख रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे याची देखील निविदा काढण्यात आली आहे.बेळगाव शहर स्मार्ट सिटी योजनेत असल्याने स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

सफाई कर्मचारी आणि हेल्थ निरीक्षक दोन शिफ्ट मध्ये गणेश पेंडाल विसर्जन स्थळांची स्वच्छतेची देखभाल करणार आहेत.नियमित पणे उत्सव काळात पूजा साहित्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे स्वच्छतेकडे प्राधान्य दिले जाणार आहे. हेस्कॉम आणि वन खात्याच्या मदतीने गणेश विसर्जन मार्गावरील अडथळे दूर केले जाणार आहेत खाली आलेल्या विद्युत तारा आणि अडथळा असलेली झाडे याची पाहणी करून काढली जाणार आहेत.

गणेश उत्सव काळात खरेदीसाठी दुकाने,जेवणाची हॉटेल्स आदी रात्री उशिरा पर्यंत सुरू करण्यास मुभा द्यावी योग्य बंदोबस्त पुरवावा अशी मागणी पोलीस खात्याकडे मनपाकडून करण्यात आली आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.