बेळगाव लाईव्ह:महापालिका इमारतीत मोकळ्या जागेत आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी ग्रंथालय सुरू केले आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी कार्यालयात ग्रंथालय आणि लोकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था केली आहे .
त्यानंतर आता महापालिका आयुक्त दुडगुंटी यांनीही महापालिका इमारतीतील मोकळ्या जागेत ग्रंथालय उभारले आहे.
15 ऑगस्ट रोजी या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. अधिकारी बैठकीत असतील, बाहेर गेले असतील तर त्यांना भेटण्यासाठी येणार्या लोकांना ताटकळत थांबावे लागते.
पण, त्यांच्यासाठी आता ग्रंथालय उभारण्यात आले असून त्याठिकाणी लोकांना चांगल्या प्रकारे आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.