Friday, December 27, 2024

/

यासाठी हलगेकर यांनी घेतली गडकरी यांची भेट

 belgaum

खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिल्ली मुक्कामी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

सेंट्रल रोड फंड मधून खानापूर तालुक्यातील रस्त्यांचा विकास करा आणि बेळगाव पणजी राष्ट्रीय महामार्गात जमीन संपादन केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अशी मागणी त्यांनी गडकरींकडे केली.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजपा युवा नेते अभिजीत चांदीलकर हे ही उपस्थित होते.

*केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत, बेळगाव पणजी महामार्गात शेतजमीन गेलेल्या शेतकरी बांधवांना त्यांच्या आवार्ड कॉपी, लवकरात लवकर देण्यात याव्यात व अनेक शेतकऱ्यांची उर्वरित नुकसान भरपाईची रक्कम देणे बाकी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि सी आर एफ. फंडातून तालुक्यातील अनेक गावांना रस्ते मंजूर करा या विषयावर चर्चा झाली.Gadkari gadkari

या शिवाय खानापूर शहरातून गेलेला जुना महामार्ग, राजा टाइल्स फॅक्टरी ते करंबळ (गोवा कत्री) पर्यंतचा रस्ता करण्याची मागणी देखील करण्यात आली.

बेळगाव बद्दल आपुलकी असून बेळगावची आपल्याला संपूर्ण माहिती असल्याचे सांगत व आपण यात जातीने लक्ष घालतो व तुमच्या समस्या लवकरात लवकर सोडवतो अशी ग्वाही दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.