बेळगाव लाईव्ह :सुलभ, सुसज्ज स्नानगृहांच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या जग्वार या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्नाटकातील पहिल्या कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स या उत्पादनाचा शुभारंभ आज गुरुवारी खानापूर रोड टिळकवाडी येथील हेडा सिरॅमिक्स येथे करण्यात आला.
खानापूर रोड टिळकवाडी येथील हेडा सिरॅमिक्स येथे आयोजित जग्वार कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स या उत्पादनाच्या शुभारंभ कार्यक्रमास हेडा सिरामिक्सचे विजय हेडा, क्रेडाई संघटना बेळगावचे अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक दीपक गोजगेकर, जग्वार कंपनीचे प्रतिनिधी एम टी हेगडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दीपक गोजगेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलांत तसेच फीत कापण्याद्वारे जग्वार कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.
शोरूमच्या उद्घाटनानंतर बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना क्रेडाई अध्यक्ष दीपक गोजगेकर म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून मी जग्वार कंपनीशी संबंधित आहे. माझ्या प्रत्येक मोठ्या प्रकल्पांमध्ये मी जग्वार कंपनीच्या उत्पादनांचा वापर करतो. मात्र या उत्पादनांच्या खरेदीसाठी यापूर्वी मला बेंगलोर वगैरे ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता आपल्या बेळगावात हेडा सिरामिक्समध्ये जग्वार कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स उपलब्ध झाली आहेत. तेंव्हा शहरवासीयांसह माझ्या समस्त व्यावसायिक बांधवांनी याचा लाभ घ्यावा.
जग्वार कंपनीचे दक्षिण भारत प्रमुख एम टी हेगडे हेगडे यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना बोलताना म्हणाले की, कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स ही जग्वार ग्रुपची नवी संकल्पना आहे. या संकल्पने अंतर्गत स्नानगृहात सॅनिटरी वेअरपासून फ्लॅशिंग सिस्टीम, हॉट वॉटर, शॉवर एनक्लोझर्स, वेलनेस प्रॉडक्ट आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील. जग्वारची उत्पादने वैश्विकदृष्ट्या एक उत्तम ब्रँड म्हणून मानली जातात. जग्वार ग्रुप गेल्या दोन दशकापासून बेळगावातील हेडा सिरामिक्स सोबत कार्यरत आहे.
कर्नाटकात आमच्या नव्या कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्सचा शुभारंभ करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि त्याचा शुभारंभ आज हेडा सिरामिक्स येथून करत आहोत. स्नानगृहाच्या बाबतीत एकाच ठिकाणी हवे ते मिळाले पाहिजे या उद्देशाने आम्ही ही संकल्पना राबवली आहे. ही संकल्पना कर्नाटकात पहिल्यांदा हेडा सिरॅमिक्समध्ये राबविली जात आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही कर्नाटकात बेळगावपासून आमच्या या नव्या संकल्पनेचा शुभारंभ करत आहोत. या ठिकाणी येऊन ग्राहक आमच्या सुविधांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन योग्य निर्णय घेऊ शकतील असा विश्वास मला आहे, असे हेगडे यांनी स्पष्ट केले.