जमिनीमधील बॉक्साईट बेकायदेशीररित्या काढून विक्री करण्याचा आरोप करत बिजगर्णी येथील आठ संशयित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी येथील चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयामध्ये सुरू होती. मात्र पुराव्याअभावी सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांनी भूविज्ञान खात्याकडून परवानगी न घेता सर्व्हे क्रमांक २४८/२ या जमिनीतील बॉक्साईट काढून विक्री करण्याचा आरोप करण्यात आला होता.
बेकायदेशीररित्या विक्री केल्यामुळे सरकारचे मोठे नुकसान झाले, असा आरोप करत या सर्वांवर गुन्हा सबळी दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल करण्यापूर्वी मातीचे परीक्षण केले नाही. याचबरोबर जमीन देखील संयुक्तपणे असल्यामुळे नेमके कोण आरोपी, हेच समजू शकले नाही.. त्यामुळे न्यायाधीश मोहन प्रभू यांनी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली
रामचंद्र भरमा पाटील, विजय भरमा पाटील, कल्लाप्पा भरमा पाटील, विठाबाई चंद्रकांत गावडे, पार्वती मारुती पाटील, भरमाण्णा गावडू पाटील, खाचू नारायण आहे. अष्टेकर, चिमांना नारायण अष्टेकर (सर्व रा. बिजगर्णी) अशी निर्दोषया सर्वांच्यावतीने ॲड. मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.