बेळगाव लाईव्ह: बेळगाव लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस मधून कधी जागेवर कधी जारकीहोळी कुटुंबातील सदस्यांचे तर कधी हेब्बाळकर कुटुंबातील सदस्याचे नाव ऐकायला मिळत असतानाच जिल्ह्यातील जेष्ठ काँग्रेस नेते माजी मंत्री विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांचे नाव चिकोडी आणि बेळगाव या दोन्ही मतदार संघासाठी पुढे येताना दिसत आहे.
जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रकाश हुक्केरी यांनी आपण बेळगाव आणि चिकोडी येथूनही लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे. दोन्हीपैकी कोणत्याही क्षेत्रात उमेदवारी देण्यात यावी, असा प्रस्ताव काँग्रेस हाय कमांड कडे पाठवला आहे अशी माहिती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली आहे.
प्रकाश हुक्केरी हे जिल्ह्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून गत शिक्षक विधान परिषद मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यांच्या काँग्रेस निष्ठेमुळे मुख्यमंत्र्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले आहे. आता त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठीही तयारी सुरू केली आहे.
देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना ते चिकोडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सदस्य म्हणून निवडून आले होते. सामान्य जनतेचे असलेला संपर्क आणि केलेली विकास कामे यामुळे त्यांचा दांडगा अनुभव असून त्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.
पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी प्रकाश हुक्केरी हे बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहेत दोन्हीपैकी कोणताही मतदारसंघ दिला तरी आपण तिथून लढू असा प्रस्ताव त्यांनी काँग्रेस हाय कमांडला दिला आहे अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस कडून लोकसभेसाठी इच्छुकांच्या यादीत हुक्केरी यांचेही आव्हान असणार आहे.
मागील 2018च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश अंगडी यांना टक्कर देणारा उमेदवार काँग्रेसकडे नव्हता शेवटच्या क्षणी प्रकाश हुक्केरी यांनी उमेदवारी साठी लॉबिंग केली होती मात्र त्यांना तिकीट मिळाले नव्हते काँग्रेसने व्ही एस साधून्नावर यांनी उमेदवारी दिली होती त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते अंगडी यांनी सहज विजय मिळवला होता त्यामुळे काँग्रेसला जिंकायचे असल्यास मजबूत उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागणार आहे.
आता मात्र एक वर्ष अगोदर पासून हुक्केरी यांनी दोन्ही पैकी कोणतेही तिकीट आपणाला मिळावे याबाबत लॉबिंग करायला सुरुवात केली आहे त्यामुळे हुक्केरी हे या लोकसभेचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहेत.