Tuesday, January 14, 2025

/

ऊर्जावान माणसं…

 belgaum

ऊन असो, वारा असो, पाऊस असो वीस पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 24 तास फिल्डवर काम करावे लागते. लोकांच्या घरात प्रकाश पाडण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

मग त्यासाठी अनेकदा जीवावर बेतणारे प्रसंगही ओढवतात. अशाच एका प्रसंगात बेळगाव शहरातील टिळक चौकातील नादुरुस्त विद्युत ट्रांसफार्मर दुरुस्त करणारा हा हेस्कॉमचा कर्तव्यदक्ष पाईक.

दोन वर्षापूर्वी महापुराच्या काळात सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत अखंड प्रयत्न केले होते. घरातील विज गेले की हेस्कॉमच्या नावाने बोटे मोडणे फारच सोपे असते. पण हा वीजपुरवठा अखंड ठेवण्यासाठी कर्मचाऱ्याकडून घेण्यात येणाऱ्या कष्टांची कोणालाही साधी खबरही नसते.Hescom hero

लोकांच्या घरात उजेड कायम राहावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे अनेकदा वीज खांबावर जीवही गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कार्यरत असणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे कौतुक होणे हे चांगल्या समाजाचे लक्षण मानले जाईल.

आज सर्वत्र 200 युनिट वीज पुरवठा मोफत,भाग्य ज्योती योजनेची चर्चा होत असताना बेळगावात प्रत्येक घरातील अंधार दूर करून प्रकाश देण्याचे काम करणाऱ्या बेळगाव हेस्कॉमच्या सर्व कर्मचाऱ्यांना एक मानाचा सल्युट द्यायला हवा.. अश्या सर्व जिगरबाज लाईनमनना टीम Belgaum Live -बेळगाव लाईव्ह कडूनही मानाचा मुजरा…

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.