Wednesday, January 8, 2025

/

शुक्रवारी पोतदार पॅनेलचा जोरदार प्रचार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवारी (दि. 27) होणार आहे. यासाठी अविनाश पोतदार पॅनेलच्या वतीने कंग्राळी बुद्रूक परिसरात प्रचार करण्यात आला. यावेळी शेतकरी आणि कारखान्याच्या हितासाठी पोतदार पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी, मार्कंडेय कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही कर्ज काढले. कारखाना चांगल्या पद्धतीने चालवण्यात येत आहे. आता तो अधिक चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यासाठी आम्ही अनेक योजना आखल्या आहेत. कारखान्याच्या 30 वषार्र्च्या भाडेकरारावरील जागेसाठी वनविभागाने 11 लाखांची मागणी केली आहे.

आम्ही सिंचनासाठी पाटबंधारे विभागाला 1 कोटी दहा लाख रूपये दिले आहेत. वनजमीन खरेदीसाठी राज्य आणि केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू आहे. आता आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे मतदारांनी कारखान्याच्या हितासाठी सर्व पंधरा पॅनेलला मतदान करावे, असे आवाहन केले.

Avinash canvasing
यावेळी कंग्राळी खुर्द, काकती, होनगा आदी गावांत मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. या पॅनेलमध्ये सामान्य गटातून अनिल पावशे, अनिल कुट्रे, अविनाश पोतदार, अशोक नाईक, बसवंत मायाण्णाचे, बाबुराव पिंगट, यल्लाप्पा रेमाण्णाचे, अनुसुचित जाती गटातुन चेतक कांबळे, अनुसूचीत जमाती गटातुन सत्याप्पा मुचंडी, ओबीसी अ वर्गातून उदय सिद्धण्णवर, ओबीसी ब वर्गातून मनोहर हुक्केरीकर, महिला वर्गातून निलिमा पावशे, वसुधा म्हाळोजी सहकारी संस्था गटातुन प्रदीप अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक वर्गातून भरत शानभाग हे उमेदवार आहेत.

मनोज पावशे, शिवाजी राक्षे, यल्लाप्पा बेळगावकर, अरूण कटांबळे आदींनी पोतदार पॅनेलसाठी प्रचार केला.Potdar election

Markandey

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.