Saturday, May 18, 2024

/

फेरीवाले मनपा कर्मचाऱ्यात यासाठी झाली वादावादी

 belgaum

महापालिकेने पुन्हा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय रोडवरील अतिक्रमणे हटविली. या कारवाई वेळी फेरीवाले आणि महापालिका कर्मचाऱ्यात वादावादी झाली.

पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेने या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली होती. पण पुन्हा याच ठिकाणी पदपथावर दुकाने थाटण्यात आली होती त्यामुळे महापालिकेने आज सकाळी हे दुकाने हटविण्याची कार्य वाही सुरू केली. त्यावेळी काही दुकानदाराने या कारवाईला विरोध केला.City corporation

आपण याबाबत आरोग्य स्थायी समिती अध्यक्ष रवी धोत्रे यांच्याकडून परवानगी घेतली आहे असे सांगून तुम्ही आमची दुकाने काढू नका, असे सांगितले पण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्यांचे काहीही येण्याचा कारवाई केली.

 belgaum

आठ दुकाने जप्त करण्यात आले असून पुन्हा या ठिकाणी दुकाने लावल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. एकूणच बेळगाव महापालिकेने अतिक्रमण विरोधी कारवाई वाढवली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.