बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात राहावा यासाठी शेतकरी बचाव पॅलेन निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे. त्यामुळे सभासदांनी शेतकरी बचाव पॅनलच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन प्रचार उद्घाटनावेळी करण्यात आले.
मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शेतकरी बचाव पॅनल उभे आहे. गुरुवारी या पॅनेलने उचगाव येथील मळेकरणी देवीचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला.
कारखान्यातील काही लोक कारखाना लीजवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. मार्कंडेय सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांनी उभा केला आहे. त्यामुळे या कारखान्यातून शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे या उद्देशाने शेतकरी बचाव पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. सभासदांनी कारखान्याच्या हितासाठी शेतकरी बचाव पॅनलच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
उचगाव परिसरात प्रचार केल्यानंतर शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी काकती येथील सिद्धेश्वर कार्यालयात सभासदांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हा कारखाना वाचवण्यासाठी आपल्याला मतदान करावे असे आवाहन केले.
यावेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर, तानाजी पाटील, आर आय पाटील यांच्यासह सभासदांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उमेदवार जोतिबा आंबोळकर, शिवाजी कुट्रे, भाऊराव पाटील, मल्लाप्पा पाटील, सुनील अष्टेकर, परशुराम कोलकर, युवराज हुलजी, सिद्धाप्पा टूमरी, वनिता अगसगेकर, वैष्णवी मुळीक, बाबासाहेब भेकणे,
लक्ष्मण नाईक, बसवराज गाणीगर,एस एल चौगुले यांच्यासह निंगाप्पा जाधव, आर के पाटील, पुंडलिक पावशे, मनोहर होनगेकर आदी उपस्थित होते.