Sunday, April 21, 2024

/

मार्कंडेयसाठी ठरले दोन पॅनेल बुधवार पासून सुरू प्रचार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी 27 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून दोन दिवसांपासून सुरू असलेली बोलणी फिस्कटली आहे. सत्ताधारी गटात दोन गट पडल्याने निवडणूक होणार आहे.

अध्यक्ष अविनाश पोतदार आणि उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी वेगवेगळे पॅनेल तयार केले असून त्यांच्यात निवडणूक होणार आहे.
कारखान्याच्या सत्ताधारी गटातर्फे एकच पॅनेल करण्यात येत होते. बुधवारी मात्र यामध्ये गटात फूट पडली असून आता दोन वेगवेगळे पॅनेल झाले आहेत.

तानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनेलची बैठक सदाशिवनगर येथे पार पडली. त्यानंतर संचालक आर. आय. पाटील आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी आपल्या पॅनेलची बाजू मांडली व आपण निवडणुकीस सामोरे जात असल्याचे माध्यमा समोर सांगितले.

आम्ही संचालक मंडळाची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केलो. अध्यक्ष अविनाश पोतदार यांनीही मंगळवारी रात्रीपर्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. पण, तानाजी पाटील यांनाच पॅनेलमध्ये घेण्यात येऊ नये अशी भूमिका त्या गटाने घेतली त्यामुळे अशेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही वेगळा पॅनेल करून लढवण्याचे ठरवले आहे असे त्यांनी सांगितले.Markandey

आम्ही शेतकर्‍यांत जाऊन आमचे मत मांडणार आहोत. शेतकर्‍यांनी उभा केलेला हा कारखाना लीजवर देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न तानाजी पाटील आणि इतर आमच्या संचालकांनी हाणून पाडला. त्यामुळे हे संचालक कारखान्यात त्यांना नको आहेत. रामभाऊ पोतदार, गुरूअण्णा कुट्रे आणि शट्टुप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने सुरू झालेला हा कारखाना शेतकर्‍यांचा आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी पॅनेल करून ही निवडणूक लढवणार आहोत, अशी माहिती आर. आय. पाटील आणि शिवाजी सुंठकर यांनी संयुक्त रित्या माध्यमाना दिली.

यावेळी यल्लोजी पाटील, जोतिबा आंबोळकर, सुनील अष्टेकर, सुरेश अगसगेकर, परशराम कोलकार, मनोहर होनगेकर, भाऊराव पाटील, बसवराज गाणीगेर, लक्ष्मण नाईक, एस. एल. चौगुले, आर. के. पाटील, दीपक पावशे, निंगाप्पा जाधव, शिवाजी कुट्रे, एल. वाय. लाळगे, पुंडलिक पावशे, जयराम पाटील इतर उपस्थित होते.

कसे आहेत दोन्ही गटाचे पॅनेल

एकीकडे आर आय पाटील, शिवाजी सुंठकर आणि तानाजी पाटील यांनी शेतकरी बचाव या गटाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं असताना दुसरीकडे अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या माध्यमातून अनेक जण निवडणुकीला सामोरं जाण्याचं ठरवलं आहे.

शेतकरी बचाव पॅनेल गुरुवारी उचगाव येथील माळेकरणी देवीच्या मंदिरापासून प्रचार सुरू करणार आहेत तर अविनाश रामभाऊ पोतदार पॅनेल गुंजेनट्टी मधून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.Markandey shugar

असे आहेत उमेदवार …

अविनाश रामभाऊ पोतदार पॅनेल
या पॅनेलमध्ये सामान्य गटातून अनिल पावशे, अनिल कुट्रे, अविनाश पोतदार, अशोक नाईक, बसवंत मायाण्णाचे, बाबुराव पिंगट, यल्लाप्पा रेमाणाचे, अनुसुचित जाती गटातून चेतक कांबळे, अनुसुचित जमाती गटातून सत्यप्पा मुचंडी, ओबीसी अ वर्गातून उदय सिद्धण्णावर, ओबीसी ब वर्गातून मनोहर हुक्केरीकर, महिला वर्गातून निलीमा पावशे, वसुधा म्हाळोजी, सहकारी संस्था गटातून प्रदीप अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक वर्गातून भरत शानभाग.

शेतकरी बचाव पॅनेल
सामान्य गटातून जोतिबा आंबोळकर, भाऊराव पाटील, मल्लाप्पा पाटील, रामचंद्र (आर. आय.) पाटील, शिवाजी कुट्रे, सिद्धाप्पा टुमरी, संभाजी (एस. एल.) चौगुले, अनुसूचित जाती गटातून परशराम कोलकार, अनुसूचित जमाती गटातून लक्ष्मण नाईक, ओबीसी अ गटातून बसवराज गाणीगेर, ओबीसी ब गटातून तानाजी पाटील, महिला गटातून वनिता अगसगेकर, वैष्णवी मुळीक, सहकार संस्था गटातून सुनील अष्टेकर आणि बिगर ऊस उत्पादक गटातून बाबासाहेब भेकणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.