Friday, December 27, 2024

/

मनपा आयुक्तांचा कामचुकापणा करणाऱ्यांना दणका

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सोमवारी पहाटे  शहराचा दौरा करत काम चुकाऊपणा करणाऱ्या सफाई कामगारांना दणका दिला आहे आपण कर्तव्य दक्ष आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.बेळगावच्या कोपऱ्या कोपऱ्यात साचलेले कचरे नागरिकांच्या प्रमाणे आयुक्तांच्या डोळ्यात देखील खुपले. सुंदर स्वच्छ असणारे बेळगाव  कचऱ्या मुळे बकाल होत चालले आहे बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बेळगावचे हे दृश्य निश्चितच घृणास्पद वाटते एकेकाळचे स्वच्छ सुंदर बेळगाव दिवसेंदिवस आपली सुंदरतेची ओळख पुसत चालले आहे या पाश्र्वभूमीवर आयुक्तांची सायकल फेरी निश्चितच दिलासादायक आहे.

रविवारी अनेकांना सुट्टी असते त्यामुळे सफाई कामगारांना सोमवारच्या पहाटे जास्त काम असेल हे  स्वत: पाहण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पहाटे उठून शहरात सायकलफेरी केली आणि नेमकी ग्राउंड रियालिटी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

आयुक्तांनी प्रभागांमध्ये जाऊन कचऱ्याची विल्हेवाट कशी होत आहे याची पाहणी केली. यावेळी त्यांनी सफाई कामगारांची बायोमेट्रिक हजेरी पाहून कामगारांना प्रोत्साहन दिले. कचऱ्याची वाहने काही वॉर्डात जाण्यास विलंब झाला हे लक्षात घेऊन त्यांनी अनेकांना कानपिचक्या दिल्या नोटीस जारी केली.

इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत: वाहनांमध्ये जाऊन कुठे कचरा पडून असल्याचे निदर्शनास आणून त्यांची पाहणी करून बेळगावचे स्वच्छ व सुंदर शहरात रूपांतर करावे अशा सूचना दिल्या. अनगोळ स्मशानभूमीचे कंपाउंड बनवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.City corporation commissinor

बेळगावसाठी आयुक्तांनी सकाळी सकाळी केलेली पाहणीची क कारवाई प्रत्येक वॉर्डात राबवावी मग आळशी सफाई कामगार जागे होतील आणि साफसफाई करतील अशी आशा जनतेतून व्यक्त होत आहे.मनपा अशोक दुडगुंटी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

आयुक्तांनी केलेल्या पहाटेच्या कारवाईने एकूणच सुस्त  सफाई कामगार जागे झाले आहेत. बायोमेट्रिक हजेरीत गैरहजर राहणाऱ्या आणि कामावर उशिरा येणाऱ्यांना कडक नोटीस बजावण्यात आयुक्तांना यश आले. इथून पुढे तरी सफाई कामगारांत शिस्त येईल आणि स्वच्छ बेळगाव सुंदर बेळगाव हे स्वप्न साकार होईल का याकडे सर्वांचे लक्ष म्हणून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.