Tuesday, January 28, 2025

/

दूरशिक्षण केंद्राच्या वतीने बेळगांव येथे प्रवेश प्रक्रियेबाबत उद्बोधन वर्गाचे आयोजन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शिवाजी विद्यापीठातील दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रमार्फत शैक्षणिक वर्ष 2023 – 24 साठी बी.ए.,बी.कॉम., एम.ए.(मराठी हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व समाजशास्त्र) एम.कॉम.,एम.एस्सी व (गणित) या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

या अनुषंगाने बेळगांव येथील सीमा भागातील विद्यार्थी,गृहिणी,कामगार,शेतकरी यांच्यासाठी सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन,ओरिटल स्कूल जवळ बेळगाव येथे उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यावेळी समन्वयक प्रा.डॉ.के.बी.पाटील उद्बोधन वर्ग घेणार असून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे सचिव व बेळगांव महानगरपालिकेचे माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे खजिनदार .प्रकाश मरगळे, सहा

.प्रा.डॉ.सचिन भोसले,डॉ.चांगदेव बंडगर, डॉ.सुशांत माने,डॉ.मुफीद मुजावर यांच्या उपस्थितीत होणार आहे.तरी सर्व प्रवेश इच्छूक व अभ्यागत यांनी उदबोधन वर्गास उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.