बेळगाव लाईव्ह :महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून व्यापार परवाना तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली असून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
व्यापार्यांना नोटीस न देताच दोन हजार रूपयांचा दंड आकारण्यात येत असल्यामुळे व्यापारी वर्गात संताप व्यक्त होत आहे.व्यापार परवान्यासाठी शहापूर परिसरात महापालिकेकडून जबरदस्ती करण्यात येत आहे.
महापालिकेचे कर्मचारी पोलिसांच्या मदतीने व्यापार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. लेखी पावती देण्यात येत असून त्यामुळे ही पावती किती खरी, असाही सवाल व्यापारी वर्गातून होत आहे.
महापालिकेकडून व्यापार परवाना नसणार्या दुकानदारांना नोटीस पाठवण्यात येत होती. त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. दंड आकारताना संगणकीय पावती देण्यात येत होती.
पण, गेल्या दोन दिवसांपासून शहापूर परिसरात महापालिकेचे कर्मचारी पोलिसांच्या मदतीने व्यापारी वर्गावर दबाव टाकत आहेत. जागीच दोन हजार रूपयांची पावती फाडण्यात येत आहे.
त्यामुळे व्यापार्यांत संताप व्यक्त होत आहे. अनेक सामान्य दुकानदारांकडे व्यापार परवाना नाही, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी त्यांना परवाना घेण्याच्या सूचना करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.