बेळगाव लाईव्ह: कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक भाविकांचे श्रध्दास्थान असलेले सौंदत्ती यल्लमा मंदिर परिसर विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी राज्याचे पर्यटन विकास मंत्रालयाचे एक पथक 31 ऑगस्ट रोजी मंदिराला भेट देणार आहेत.
सौंदत्ती यल्लम्मा मतदारसंघाचे आमदार विश्वास वैद्य यांच्या विशेष विनंतीवरून पर्यटन विभागाचे मंत्री एच.के.पाटीला हे 31 ऑगस्टला मंदिरात अधिकाऱ्यांचे पथक पाठवून मतदारसंघाचा विकास कसा करता येईल याची चौकशी करून अहवाल पर्यटन विभागाला देणार आहेत.
यल्लम्मा मंदिराला दरवर्षी एक कोटीहून अधिक पर्यटक आणि भाविक भेट देतात. त्यांना निवास व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. भाविकांच्या निवासासाठी दोन हजार गेस्ट हाउस अपार्टमेंट, सुसज्ज स्वच्छतागृहे आणि मंदिर परिसराच्या विकासासाठी विशेष योजना राबविण्यास शासनाचे विशेष स्वारस्य दाखवले आहे.
यल्लम्मा मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य देण्याबरोबरच भाविकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे.
त्यामुळेच अधिका-यांचे पथक ३१ ऑगस्टला यल्लम्मा देवीचे दर्शन घेणार आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर आणि शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरांच्या आदर्शावर या पवित्र स्थळाचा विकास व्हावा, ही सौन्दत्ती यल्लम्मा देवीच्या लाखो भक्तांची इच्छा आहे. त्यामुळे या पाहणी दोऱ्यातून कितपत फायदा होईल हे पाहावे लागणार आहे.