Tuesday, November 19, 2024

/

वडगाव पशु चिकित्सालय स्थलांतर रद्द करण्याची मागणी

 belgaum

वडगाव येथील पशु चिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करण्याबरोबरच बळ्ळारी नाला स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात यावे, अशी मागणी शेती सुधारणा युवक मंडळ विष्णू गल्ली वडगाव यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

शेतकरी नेते राजू मरवे तसेच शेती सुधारणा युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव दक्षिण मतदार संघातील शहर वडगाव, जुने बेळगाव, शहापूर या भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वास्तव्य असल्याने हजारो जनावरं तसेच अनेक पाळीव प्राणीही आहेत.

त्यांच्या चिकित्सेसाठी वडगावमधील मनपाच्या जागेत शेतकरी व जनतेच्या मागणीवरून गेल्या 15/20 वर्षांपूर्वी सरकारी पशु चिकित्सालय सुरू करण्यात आले. हे चिकित्सालय शेतकरी व जनतेला अत्यंत सोईचे झाले आहे.

तथापी अलिकडे सदरी दवाखान्यात वीज पुरवठ्यासह जनावरांची औषधे ठेवण्यासाठी फ्रिजची व्यवस्था नसल्यामुळे येथील डॉक्टरांची अत्यंत गैरसोय होत आहे. सदरी जागा ही मनपाच्या अख्यारित असूनही सदर दवाखान्यासाठी विजेची सोय करून देण्यात आलेली नाही. याच मुख्य कारणास्तव पशुवैद्यकीय खात्याकडून सदरी पशुचिकित्सालय इतरत्र दुरच्या ठिकाणी हलविण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत. तरी येथील शेतकरी व पशुपालकांच्या सोयीसाठी तसेच पाळीव प्राण्यांच्या हिताच्या दृष्टीने सदरी पशु चिकित्सालयाचे स्थलांतर रद्द करून संबंधित सर्वांना दिलासा द्यावा. सदर पशु चिकित्सालय आहे त्याच जागेत ठेवण्याबरोबरच ते नव्याने बांधून सर्व दृष्टीने सुसज्ज करावे ही नव्याने स्थापित झालेल्या कर्नाटक सरकारकडे आदरपूर्वक कळकळीची विनंती.Demand vadgaon

त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना तापदायक ठरलेला बळ्ळारी नाला साफ करून परिसरातील शेतकऱ्यांना पीक घेण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जर पशु चिकित्सालय अन्यत्र हलवल्यास या भागातील सर्व शेतकरी व जनता आपली जनावरे व पाळीव प्राण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने येऊन धरणे धरल्याशिवाय रहाणार नाहीत, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी राजू मरवे यांच्यासह आर. के. पाटील, एस. पी. पाखरे, एन. एन. जाधव, अमोल देसाई ,नेताजी जाधव,ए. एन. सातेरी, संतोष चव्हाण, तवनाप्पा पाटील, शिवलीला मिसाळे आदीसह शेती सुधारणा युवक मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी उपस्थित होते. उपरोक्त निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, पशु संगोपन मंत्री, जिल्हा पालकमंत्री आणि बेळगाव दक्षिणचे आमदारांना देखील धाडण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.