Saturday, December 7, 2024

/

‘ते’ बॅरिकेड्स त्वरित हटवण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 belgaum

शहरातील विद्यार्थी -विद्यार्थिनी आणि वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरणारे सन्मान हॉटेलसमोरील कॉलेज रोडवर घालण्यात आलेले बॅरिकेड्स त्वरित हटवून रस्ता खुला करावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शहरातील नागरिकांच्यावतीने प्रभाग क्र. 7 चे नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव महापालिका व्याप्तीतील कॉलेज रोड या द्विपदरी मार्गावर हॉटेल सन्मान समोर दुभाजकामधील रस्ता बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आला आहे.

यामुळे आमच्या भागातील कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली आणि गणाचारी गल्ली तसेच नार्वेकर गल्ली, समादेवी गल्ली, केळकर बागसह शहराच्या मध्यवर्ती भागातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी वनिता विद्यालय जवळ यंदे खूट येथे सिग्नलची व्यवस्था असतानाही बॅरिकेड्स घालून रस्ता बंद करण्यात आला होता. आता सन्मान हॉटेल समोरील रस्त्यावर बॅरिकेड्स घालून रस्ता ओलांडण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे.Barricades

सन्मान हॉटेलच्या बाजूला अनेक हॉस्पिटल्स आणि शाळा महाविद्यालये असून सदर बॅरिकेड्समुळे नागरिकांसह विद्यार्थी -विद्यार्थिनींची गैरसोय होऊन मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी सन्मान हॉटेल समोरील संबंधित बॅरिकेड्स येत्या आठवड्याभरात हटवून रस्ता सुगम संचारासाठी खुला करावा अशी आपल्याला विनंती आहे असे झाले नाही तर त्रासलेले नागरिकच ते बॅरिकेड्स हटवण्याची शक्यता आहे, अशा आशयाचा तपशील जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर करतेवेळी नगरसेवक डॉ. शंकरगौडा पाटील यांच्या समवेत कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, गवळी गल्ली आणि गणाचारी गल्ली येथील बरेच नागरिक उपस्थित होते. यावेळी नगरसेवक डाॅ. पाटील यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना सन्मान हॉटेलसमोर रस्त्यावर घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे निर्माण झालेल्या समस्येची माहिती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.