बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील विशेष करून कडोली, देवगिरी, जाफरवाडी केदनूर व मन्नीकेरी येथील शेतकऱ्यांच्या शेत पिकांसाठी नियमित वीज पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरु सेनेतर्फे शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
बेळगाव तालुक्यामध्ये हजारो एकर भात जमीन आहे. दरवर्षी या जमिनीतून भरघोस प्रमाणात तांदळाचे उत्पन्न घेतले जाते. यंदा पाऊस कमी झाल्याने पिकांना बोअरवेलचे पाणी द्यावे लागते. तथापि सातत्याने वीजपुरवठा खंडित सोत असल्याने पिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत.
त्यामुळे सध्या वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने कडोली, देवगिरी, जाफरवाडी, केदनुर मन्नीकेरी या भागात सातत्याने खंडित वीज पुरवठ्याची समस्या भेडसावत आहे. तेंव्हा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी या भागात नियमित वीज पुरवठा करण्याची सूचना हेस्कॉनच्या अधिकाऱ्यांना केली जावी ही विनंती, अशा असे आता तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करण्यापूर्वी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आप्पासाहेब देसाई यांनी शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात माहिती दिली. निवेदन सादर करतेवेळी देसाई यांच्या समवेत सुभाष धायगोंडे, चंद्रू राजाई, मारुती कडेमणी, दुंडाप्पा पाटील आदी रयत संघ व हसीरु सेनेचे सदस्य शेतकरी उपस्थित होते.