कर्नाटकी विधीमंडळ अधिवेशनाविरोधात 2021 साली महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी म. ए. समितीच्या 31 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाची सुनावणी सोमवारी (दि. 21) होती. म. ए. समिती नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. पण, ही सुनावणी लांबणीवर पडली.
चौथे जेएमएफसी न्यायालयात आज सुनावणी होणार होती. संशयित 31 पैकी केवळ 1 जण अनुपस्थित राहिला. त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली. दोषारोपपत्र दाखल झाले नाही.
2021 साली कर्नाटक सरकारने हलगा येथील सुवर्णसौध येथे विधीमंडळ अधिवेशनाचे आयोजन केले होते. त्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण, या महामेळाव्याला महापालिकेने परवानगी दिली नाही.
त्यामुळे महापालिकेने टिळकवाडी पोलिसांत अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह 31 जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्याची सुनावणी आज होती. पण, दीपक दळवी प्रकृती ठिक नसल्यामुळे गैरहजर राहिल्याने सुनावणी लांबणीवर पडली.
म. ए. समितीच्या वतीने अॅड. महेश बिर्जे, अॅड. बाळासाहेब कागणकर, अॅड. एम. बी. बोंद्रे आणि अॅड. वैभव कुट्रे काम पाहात आहेत.