बेळगाव लाईव्ह: हायवे वर जर कुणी चुकीच्या पद्धतीने नियम मोडून गाडी चालवत प्रवास करत असेल तर त्यांना देखील दंड भरावा लागणार आहे.
कारण बंगळुरु ते बेळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर देखील 72 एएनपीआर कॅमेरे बसवले जाणार आहेत कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी एक पोस्ट ट्विट करत त्यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
72 एएनपीआर कॅमेरे हायवे वर बसवून रहदारीला शिस्त लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न असणार आहे जर कुणी रहदारीचे नियम पाळत नसतील ते त्याचे दृश्ये कॅमेऱ्यात कैद होणार आहेत त्यामुळे कंट्रोल रुम मधून सदर वाहनांना दंड ठोठावला जाणार आहे.
72 ANPR Cameras installed on Pune- Bengaluru NH up to Belagavi
Lane violations
Driving in opposite direction
Driver on call
Without seat belt in front seat
Without helmet
Triple ridingviolations being captured
“”Plz follow Traffic rules : save your life & money both” pic.twitter.com/niaOI6fMyv
— alok kumar (@alokkumar6994) August 31, 2023
हायवे वरील लेनची शिस्त मोडलेल्याना,विरुद्ध दिशेने गाडी चालवणाऱ्याना, गाडी चालवताना वाहन चालक मोबाईल वर बोलत असताना, सिट बेल्ट न बांधनाऱ्यांना, विना हेल्मेट आणि तीन सिट गाडी चालावणाऱ्यांना कॅमेऱ्यात अडकवून दंड वसूल केला जाणार आहे.
या अगोदर शहर परिसरात बसवलेल्या कॅमेऱ्या द्वारे कंट्रोल रूम मधून रहदारीला नियंत्रण केले जायचे आणि रहदारी नियम मोडणाऱ्याना कॅमेऱ्यात पाहून पोस्टाने दंड पोहोचवला जात आहे मात्र ही सुविधा हायवे वर नव्हती आता हायवे वर देखील कॅमेरे बसवणार असल्याने एकतर रहदारी नियंत्रण केली जाणार याशिवाय कुणी प्रवास केला याची माहिती मिळणार असून कॅमेऱ्यांची नजर असणार आहे.