बेळगाव लाईव्ह :काँग्रेसने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली सगळी आश्वासने पूर्ण केली आहेत. पाचपैकी चार गॅरंटी योजनांची पूर्तता करण्यात आली असून गृहलक्ष्मी योजनेतून मिळणारे दोन हजार रूपये महिलांनी बचत करावी आणि या पैशातून महागाई वर मात करावी असे आवाहन आमदार राजू सेठ यांनी केले.
राज्य सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेला बुधवारी कुमार गंधर्व रंगमंदिरात सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार सेठ बोलत होते. ते म्हणाले. काँग्रेस पक्ष देशाच्या गरीब शेतकरी आणि दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी नेहमीच काम करत आहे. राज्यातील काँग्रेसचे सरकार हे या घटकांचे सरकार आहे ते सर्वांना घेऊन यापुढेही असेच काम करत राहणार आहे त्यामुळेच मुख्यमंत्री सिद्ध रामय्या यांच्या नेतृत्वाखाली हे आगेकूच करेल .
अन्नभाग्य योजना, शक्ती योजना, गृहज्योती योजना आम्ही यापूर्वीच राबवल्या आहेत. आता गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये दिले जातात.
काँग्रेस पक्षाने दिलेले आश्वासन पाळले आहे. महागाईमुळे त्रस्त कुटुंबाला या योजनेमुळे मदत होणार आहे. युवा निधी हमी योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. सर्वांनी शासकीय हमी योजनांचा लाभ घ्यावा.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणार्या महिला शक्ती संघांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच महिलांना गृहलक्ष्मी योजनेचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी, सामान्य प्रशासन उपायुक्त भाग्यश्री हुग्गी, नगरसेविका अफरोज मुल्ला, रेश्मा भैरकदार, शाहिद पठाण यांच्यासह महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व महिला उपस्थित होत्या.