Tuesday, January 28, 2025

/

केकेएमपी मालमत्तेची आर्थिक देखभाल स्वखर्चाने :

 belgaum

सदाशिवनगर बेळगाव येथील सीटीएस क्र. 10917 मधील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या 20 वर्षाच्या लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल स्वखर्चाने करण्याचा संकल्प माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी केला आहे.

कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेच्या (केकेएमपी) राज्य कार्यकारिणीच्या बेंगळूर येथे झालेल्या वार्षिक बैठकीत मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उचलल्या जाणाऱ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

या चर्चेप्रसंगी बोलताना बेळगांव उत्तर मतदार संघाचे माजी आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की बेळगांव जिल्हा कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे अध्यक्ष या नात्याने आज मी माननीय प्रदेशाध्यक्ष सुरेशराव साठे व राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदाशिवनगर, बेळगांव येथील सीटीएस क्र. 10917 च्या 20 वर्षाच्या परिषदेच्या लीजवरील मालमत्तेची संपूर्ण आर्थिक देखभाल माझ्या स्वखर्चाने करेन असा संकल्प केला.

 belgaum

येत्या काळात कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यांच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना एक भव्य वसतिगृह बांधून मोफत निवासाची सोय केली जाईल असेही त्यांनी सांगितले. सदर बैठकीस प्रदेशाध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व जिल्ह्यातील कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे (केकेएमपी) पदाधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.