खानापूर तालुक्यातील मान येथील शिंगोळी धबधब्यात कोसळून पाण्यात बुडाल्याने एका युवकाचा मृत्यू तर सुदैवाने एक जण बचावला असल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे.
आयान पठाण (वय 20) रा. हुंचेनहट्टी असे मयत झालेल्या तांत्रिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव असून मंजुनाथ लमानी रा.पिरणवाडी असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे.
खानापूर तालुक्यात जांबोटी,पारवाड अशा अनेक ठिकाणी पर्यटन स्थळे आहेत अनेक लहान मोठे धबधबे पावसात ओसंडून वहात असतात अशाच खानापूर तालुक्यातील मान जवळील शिंबोली धबधब्याच्या मिळालेली माहिती पिरणवाडी व हुंचेनहट्टी येथील काही युवक चोल परिसरात असलेल्या माण येथील शिंगोळी या धबधब्याच्या ठिकाणी आनंद लुटाउक झला गेले होते.
बेळगाव येथील सरकारी तांत्रिक महाविद्यालयाचे सहा तेवसात विद्यार्थ्यांनी आनंद लुटण्यासाठी मान धबधब्याला गेले होते. यामधील एका युवकाचा धबधब्याखाली पाय घसरल्याने पाण्यात कोसळून धबधब्याच्या प्रवाहात वाहून गेला याच्या समवेत याचा मित्रही पाण्यात पडला गेला यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण बचावला गेल्याची घटना बुधवारी दुपारी खानापूर तालुक्यातील मान धबधबा येथे घडली.
त्यांच्या समवेत आणखी पाच सहा मित्र ही होते, वरून पडणाऱ्या पाण्याच्या धबधब्यात आनंद लुटण्यासाठी पाण्याचा प्रवाहा खाली ते दोघे गेले असता एक जण तोल जाऊन खाली पडला. तो 15 ते 20 मिनिटे बाहेर पडला नाही. तर त्याच्या समवेत असलेल्या आणखीन एकटा धबधब्याखाली तोल जाऊन पडला गेला तो लागलीच बाहेर आल्याने तो यामधून बालाबाल बचावला. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी पर्यटकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सदर घटनेची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे.