Sunday, June 16, 2024

/

आयसीएआय तर्फे उद्यापासून “टॅक्स क्लिनिक” कार्यक्रम

 belgaum

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) सदर्न रीजनल कौन्सिल यांच्यातर्फे डायरेक्ट टॅक्स कमिटी ऑफ आयसीएआय अँड पब्लिकेशनच्या मार्गदर्शनाखाली उद्या गुरुवार दि. 13 आणि शुक्रवार दि. 14 जुलै रोजी “टॅक्स क्लिनिक” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयकर विभाग आणि आयकर संचलनालय (पीआर, पी अँड पी) यांच्या पाठिंब्याने 13 व 14 जुलै रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शुक्रवार पेठ, टिळकवाडी (पहिल्या रेल्वे गेटनजीक) येथील स्वरूप प्लाझाच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीएआय भवनमध्ये हा टॅक्स क्लिनिक कार्यक्रम होणार आहे.

करा संबंधी जनजागृती करणे, करांच्या अनुपालन प्रचारासाठी तसेच 31 जुलै 2023 पर्यंत भरावयाच्या आयटीआर इ-फिलिंग संदर्भातील सर्वसामान्य करदात्यांच्या शंका व प्रश्नांचे निरसन करण्यासाठी या टॅक्स क्लिनिकचे आयोजन करण्यात आले आहे.Tax ca

 belgaum

आयसीएआय बेळगाव शाखेच्या व्यवस्थापन समितीच्यावतीने बोलताना सेक्रेटरी सीए विरण्णा एम. मुरगोड यांनी सदर दोन दिवसाच्या टॅक्स क्लिनिकचे उद्घाटन बेळगाव येथील आयकर खात्याचे संयुक्त आयुक्त राजगोपाल पार्थसारथी यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगितले. सदर टॅक्स क्लिनिक कार्यक्रमाद्वारे आयकर कायदा 1961 अंतर्गत कर परतावा भरण्यासंदर्भातील प्रश्न आणि शंकांचे निरसन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे कर अनुपालना बाबत जनजागृती करणे, देशाचा कर आधार वाढवणे आणि करदात्यांना स्वयंस्फूर्तीने कर परतावा भरण्यास प्रेरित करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे मुरगोड यांनी स्पष्ट केले.

त्याचप्रमाणे नागरिकांनी या टॅक्स क्लिनिक कार्यक्रमाचा बहुसंख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.