भारत बिल पेमेंट सिस्टीम (बीबीपीएस) ॲप्सद्वारे ऑनलाइन वीज बिल भरण्याची गेल्या 18 मार्च 2023 मध्ये बंद करण्यात आलेली प्रक्रिया अद्यापही सुरू करण्यात आली नसल्यामुळे ग्राहकांना सध्या फक्त हेस्कॉम वेबसाईटवर विसंबून राहावे लागत आहे.
बीबीपीएस ऑनलाइन सुविधा बंद करण्यात आल्यामुळे विज बिल भरण्यासाठी सुलभ असलेल्या जीपीएवाय, फोन पे, क्रीड, पेटीएम आदी युपीआय ॲप्सपासून वंचित राहिलेल्या
ग्राहकांना उपलब्ध वेबसाईटवर ऑनलाइन वीज बिल भरण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागत आहेत. सध्या विजेचे बिल भरण्यासाठी ग्राहक त्यांच्या स्थानावर आधारित पुढील लिंक्सवर भेट देऊ शकतात.
-शहरी भाग : https://www.hescom.co.in/SCP/Myhome.aspx
-ग्रामीण भाग : https://hescomonlineservices.nsoft.in/ हेस्कॉमने या लिंक्स उपलब्ध केल्या असल्या तरी त्यावर कांही वेळा एरर आल्यामुळे विज बिल अदा करणे अवघड जाऊ शकते.