बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शनिवारी (२२ जून) खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
खानापुरा तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुटी जाहीर केली असून सुरक्षेच्या कारणास्तव या भागातील धबधब्यांना भेट देण्यासही पर्यटकांना निर्बंध घालण्यात आले आहेत.
खानापूर तालुक्यातील चिखले, परतवाडा व चिगुळे जलप्रपात वगळता खानापूर तालुक्यातील इतर सर्व धबधब्यांना पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
दुथडी भरून वाहतेय मलप्रभा नदी – पाण्याखाली गेले स्वयंभू मारुती मंदिर हब्बनट्टी 21 जुलै 2023 pic.twitter.com/kAykmk1tt9
— Belgaumlive (@belgaumlive) July 21, 2023
जनतेच्या सुरक्षेसाठी इतर धबधब्यांना भेट देण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे
खानापूर तालुक्यात 21जुलै रोजी 71मी मी पावसाची नोंद झाली आहे या शिवाय मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत असून हब्बनट्टी येथील स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेली आहे.
एकूणच खानापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन व्यस्त झाले आहे यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी खानापूर तालुक्यातील शाळांना शनिवारी सुट्टी दिली आहे याशिवाय खानापूर तालुक्यातल्या धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास बंदी देखील घातली आहे.
शनिवारी खानापुर मधील शाळांना सुट्टी तर पर्यटकांना तालुक्यातील धबधब्यावर जाण्यास बंदी https://t.co/1zse9PS5Jj pic.twitter.com/dDaiAajJTM
— Belgaumlive (@belgaumlive) July 21, 2023