रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर व सचिव मनोज मायकल यांच्यासह नव्या कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण समारंभ उद्या मग येथील फाउंड्री क्लस्टर सभागृहात काल रविवारी उत्साहात पार पडला.
सदर समारंभास इन्स्टॉलिंग अधिकारी व प्रमुख पाहुणे म्हणून गोवा येथील माजी प्रांतपाल रो. डाॅ. विनय पै रायकर आणि सन्माननीय अतिथी म्हणून रो. रेणू कुलकर्णी उपस्थित होते. प्रारंभी क्लबचे मावळते अध्यक्ष रो. बसवराज विभूती यांनी सर्वांचे स्वागत केले. रो. अक्षय कुलकर्णी यांनी गेल्या वर्षभरातील क्लबच्या कार्याची माहिती दिली. यावेळी गेल्या वर्षभरातील उल्लेखनीय कार्याबद्दल डाॅ. मनीषा हेरेकर यांना आऊट स्टँडिंग ‘रोटेरियन ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यंदा बेळगाव रोटरीच्या सदस्यांनी मानवतावादी कार्यासाठी रोटरी फाउंडेशनला 42,50,000 रुपयांची उस्फुर्त देणगी देऊ केल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यासाठी खास करून क्लबचे मावळते अध्यक्ष विभूती डॉ. सचिन माहुली रो. दिलीप चिटणीस आणि रो विशाल पट्टणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. क्लबला देणगी दिल्याबद्दल सुनीश मेत्रानी आणि अनिश मेत्रानी यांना देखील गौरविण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे नूतन अध्यक्ष म्हणून पदाधिकार स्वीकारल्यानंतर बोलताना रो. जयदीप सिद्दण्णावर यांनी आगामी वर्षभरात आपल्याकडून राबविण्यात जाणाऱ्या जनहितार्थ उपक्रमांची थोडक्यात माहिती देऊन ते यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी इन्स्टॉलिंग अधिकारी गोवा येथील माजी प्रांतपाल डॉ. विनय पै रायकर यांनी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. तसेच नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर समारंभात 2023 -24 सालासाठी क्लबचे नूतन अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर, सेक्रेटरी मनोज मायकल आणि खजिनदार नितीन गुजर त्यांच्यासह कार्यकारणीच्या नवे सदस्य पुढील वर्षाचे अध्यक्ष सुहास चांडक, उपाध्यक्ष संदीप नाईक, मावळते अध्यक्ष बसवराज विभुती, संयुक्त सचिव मनीषा हेरेकर, खजिनदार नितीन गुजर, संचालक क्लब सेवा मनोज पै, संचालक समाज सेवा तुषार पाटील, संचालक युवजन सेवा विशाल पट्टणशेट्टी, संचालक व्यावसायिक सेवा व जनसंपर्क प्रमुख माजी अध्यक्ष ॲड. सचिन बिच्चू, संचालक आंतरराष्ट्रीय सेवा अशोक परांजपे, मेंबरशिप चेअरमन सुनील काटवे, सतीश धामणकर, कौस्तुभ देसाई आणि माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी यांना अधिकार पदाची शपथ देऊन अधिकार प्रदान करण्यात आले.
प्रारंभी रो. मनोज हुईलगोळ व रो. संतोष पावटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला रो. डाॅ. शिल्पा कोडकनी आणि डॉ माधव प्रभू यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. समारंभास इनरव्हील क्लब ऑफ बेळगावच्या पदाधिकारी आणि सदस्यांसह रोटरी क्लब बेळगावचे मावळते पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच हितचिंतक उपस्थित होते.