Friday, May 24, 2024

/

नेमकं कशासाठी भाजपने बेळगावात केलं आंदोलन

 belgaum

भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव जिल्हा आणि ग्रामीण घटकातर्फे आज शनिवारी सकाळी राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे तीव्र आंदोलन छेडून सरकारचा निषेध करण्यात आला.

राज्यातील काँग्रेस सरकारच्या विरोधात माजी आमदार ॲड. अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, एम. बी. जिरली, धनंजय जाधव, डॉ. सोनाली सरनोबत व उज्वला बडवानाचे या नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी आज सकाळी शहरात आंदोलन छेडले. राणी चन्नम्मा सर्कल येथे छेडण्यात आलेल्या या आंदोलनाप्रसंगी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, राज्यातील काँग्रेस सरकारने दोन महिन्यात आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली आहे. विशेष करून गोहत्या बंदी कायदा, धर्मांतर बंदी कायदा, एपीएमसी कायदा मागे घेऊन त्यांनी हिंदू धर्मियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्याच दिवशी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या त्यासंदर्भात अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही याचा अर्थ हे हिंदू विरोधी सरकार आहे असा होतो. आयएएस अधिकाऱ्यांना आमदारांच्या सेवेला जमवून त्यांचा अपमान करण्याचे काम हे सरकार करत आहे असे सांगून या सरकारने वेळीच शहाणे व्हावे, असे बेनके म्हणाले.

 belgaum

महांतेश कवटगीमठ यांनी काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी सर्वांसाठी मोफत वीज, महिलांना मानधन वगैरे गॅरंटी योजनांची घोषणा केली मात्र सत्तेवर येताच या योजनांसाठी अनेक अटी -नियम घातले. या पद्धतीने प्रत्येक गोष्टीत जनतेची दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले आहे. किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्राच्या निधी बरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकार वाढीव 4 हजार रुपये देत होते. हा निधी बंद करणारे काँग्रेस सरकार हे शेतकरी विरोधी आहे. येत्या काळात ही सर्व काही थांबले नाही तर गावोगावी आंदोलन छेडले जाईल असे सांगून शेतकऱ्यांचा निधी पूर्ववत सुरू केला जावा, असे मत कटगीमठ यांनी व्यक्त केले.

माजी आमदार संजय पाटील आपले परखड मत व्यक्त करताना गेल्या 13 मे ला विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. त्या पहिल्याच दिवशी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ऐकायला मिळाल्या त्यानंतर हिंदू कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम काँग्रेस सरकारने सुरू केले. माझा काँग्रेसच्या बाबतीत एकच प्रश्न आहे या भारत देशात हिंदूंनी जगायची की नाही? हिंदूंसाठी तुमची काही जबाबदारी आहे की नाही? गोहत्या बंदी कायदा रद्द करता याचा अर्थ तुम्ही गाईला देव म्हणत नाही का? तुम्ही सर्वांना वीज मोफत देतो, महिलांना 2000 रुपये देतो अशी खोटी आश्वासने देऊन अधिकारावर आलात ठीक आहे. मात्र आता अधिकारात आल्यानंतर चांगले काम तरी करा. आता दहशतवादी चक्क बेंगळुरात आले आहेत ते दिसत नाहीत, मात्र हिंदू कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून तुम्ही एका समाजाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहात. एवढेच नव्हे तर एका जैन मुनीची हत्या होते. या प्रकरणी हिंदू व मुस्लिम अशा दोघ जणांना अटक झाली आहे. मात्र यापैकी हिंदू माणसाचे नांव पुढे करून त्याच्या डोक्यावर खुनाचे खापर फोडण्यात येत आहे. याचा अर्थ काय? तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? एका समाजावर प्रेम करणे म्हणजे राजकारण नव्हे. तुम्ही सर्वांना बरोबर घेऊन जा. हिंदू , मुस्लिम, सिख, इसाई हे सगळे आमचेच आहेत. मात्र तुम्ही एका जातीवर प्रेम करून हिंदूंवर अन्याय करण्याचे काम करत आहात. तुम्हाला जनता माफ करणार नाही. यासाठीच भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.Bjp protest

हिंदूंवर अन्याय होत आहे म्हणून आम्ही जनतेला जागे करत आहोत. जनतेला माझे हात जोडून विनंती आहे आता दूध महागले, वीज बिल अव्वाच्यासव्वा येत आहे. तुमचाच पैसा सरकार तुम्हाला परत देत आहे, तुम्हाला वाटतंय सर्व कांही फ्री मिळतंय. कुणीही कुणाच्या बापाच्या घरातलं देत नाही. मग ते कोणतेही सरकार असू दे. स्वतः सिद्धरामय्या यांनी तशी कबुली दिली आहे.

दुसरीकडे हिंदू धर्म कोणी सांभाळायचा? आज देशाची संस्कृती कोण सांभाळणार? याचाही विचार जनतेने करावा. भाजप कार्यकर्ते मात्र वेळ पडेल तेंव्हा रस्त्यावर उतरतील आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतील असे सांगून काँग्रेसला एवढीच विनंती सर्वांना समान न्याय द्या, समान नजरेने बघा, असे माजी आमदार संजय पाटील शेवटी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.