Thursday, May 16, 2024

/

लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या बालेकिल्ल्यात रमेश जारकीहोळींचा झेंडा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गत विधान सभेचे बेळगाव ग्रामीण मधील युद्ध जरी लक्ष्मी हेब्बाळकरांनी जिंकले असले तरी सध्या रमेश जारकीहोळी यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपद निवडीत आमदारांना चांगलीच दमछाक करायला लावली आहे.

निलजी, सांबरा, बेनकनहळळी सह मराठी बहुल भागात अनेक ग्रामपंचायतीवर भाजपच्या रमेश जारकीहोळी समर्थकांचा विजय झाला आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र एकीकरण समितीनेही आपले बालेकिल्ले शाबूत ठेवले आहेत. निलजी, व्यतिरिक्त मण्णूर, आंबेवाडी ग्रामपंचायतीवर समितीने आणि इतर काही ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व शाबूत ठेवले आहे. सध्याच्या मंत्रिमहोदयांनामंत्रिपद मिळाले असले तरी ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी त्यांना चांगलीच दमछाक करावी लागत आहे असे चित्र दिसत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी चुरशीने निवडणूक लढविली. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि गोकाक मतदार संघाचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यातील द्वंद्व युद्ध चांगलेच तापले. राजकीय वातावरणात संपूर्ण राज्यात उभयतांमधील राजकीय वादावादीची चांगलीच चर्चा रंगली.

 belgaum

या युद्धात हेब्बाळकरांनी पुन्हा ग्रामीणवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मंत्रिपदीही त्यांची वर्णी लागली. मात्र ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक मंत्रीमहोदयांना पुन्हा दमछाक करावणारी ठरली. विधानसभा निवडणुकीत भलेही रमेश जारकीहोळी समर्थकांचा पराभव झाला, जारकीहोळी समर्थकांना ५१००० आणि समितीला ४१००० मतांवर समाधान मानावे लागले तरी रमेश जारकीहोळी समर्थकांनी स्थानिक राजकारणात बहुतांशी ग्रामपंचायती आपल्या हाती घेत पुन्हा आपले अस्तित्व अधोरेखित केले आहे.

दोन्ही राजकीय नेत्यांच्या गटबाजीचा प्रतिष्ठेचा आखाडा असलेल्या बेळगाव तालुक्यातील निलजी गावातील अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. आणि निलजी ग्रामपंचायतीवर भाजपचेच वर्चस्व प्रस्थापित झाले. काही दिवसांपूर्वी निलजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्यांचे अपहरण झाल्याची अटकळ निलजीमध्ये रंगली होती. या गावच्या ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष -उपाध्यक्षपदाची निवडणूक आज घेण्याचा निर्णय ग्रामपंचायत निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एसीपी नारायण बरमणी यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक पोलीस कर्मचारी आणि केएसआरपी पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. या पंचायतीच्या निवडणुकीदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांना रिसॉर्टमध्ये खाजगी वाहनातून घेऊन गेल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गावातील सदस्यांनी पोलिस बंदोबस्तात मतदान केले.Ramesh j

अशा या साऱ्या वातावरणाचा एकंदर कल लक्षात घेता अद्यापही जारकीहोळी वर्सेस हेब्बाळकर यांच्यातील शीतयुद्ध संपल्याचे दिसून येत नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या राजकारण्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही आपली ताकद आजमावली. हिंडलगा ग्राम पंचायत पोट निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने हेब्बाळकर समर्थकाचा पराभव केला आहे.

राज्यात जरी काँग्रेसची सत्ता असली तरी अद्यापही राज्यांतर्गत होणाऱ्या ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, एपीएमसी, जिल्हा सहकारी बँक अशा पातळीवरील निवडणुकीत राजकारणी आपली प्रतिष्ठा आजमावत असल्याचे चित्र आहे. आज विविध ग्रामपंचायतींच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत देखील असेच चित्र पाहायला मिळाले असून बहुतांशी ग्रामपंचायतींवर भाजप आणि समितीने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.