बेळगावातील किल्ला तलावात आत्महत्या करायला उडी टाकलेल्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या त्या कॉन्स्टेबलचे सोशल मीडियासह सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
एरव्ही वाहन चालकांकडून दंड वसुली करणारे बेळगावचे रहदारी पोलिसांचा उलट सुलट चर्चा करणारे नेटकरी देखील जीव वाचणाऱ्या बेळगाव उत्तर रहदारी पोलीस स्थानकातील कॉन्स्टेबल काशिनाथ इरगर यांचे तोंडभरून कौतुक करत आहेत.
शनिवारी सायंकाळी घटना घडल्यावर सदर बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली ट्रेंड देखील बनली. जीव वाचवणाऱ्या कॉन्स्टेबलचे समाजात झालेले कौतुक पाहताच पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील काशिनाथ यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे.
पोलीस आयुक्त एम. एन. सिद्धरामाप्पा यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या करू पाहणाऱ्या महिलेचा जीव वाचवणाऱ्या काशिनाथ यांना पाच हजार रुपये रोख रक्कम बक्षीस जाहीर केले या शिवाय मुख्यमंत्री पदकासाठी शिफारस करण्याची घोषणा केली.
*तिच्यासाठी.. देवदूत बनून धावला ट्रॅफिक पोलिस*