निकृष्ट दर्जाच्या ‘या’ सीडी वर्ककडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी

0
4
Cd work
 belgaum

हिंडलगा रोड, जयनगर येथील कोसळलेल्या निकृष्ट दर्जाच्या सीडी वर्कच्या कामाकडे लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंडलगा रोड जयनगर येथे गेल्या दीड महिन्यापासून गटार बांधकाम आणि सीडी वर्कचे काम रखडत सुरू आहे. त्याचप्रमाणे ही विकास कामे अवैज्ञानिक दृष्ट्या करण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची होत आहेत. सदर विकास कामांचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने या ठिकाण गटारीसाठी रस्त्यावर जे सीडी वर्क केले आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

नावाला सिमेंटचा वापर करून पूर्णपणे खडी आणि वाळूचा वापर करून हे निकृष्ट बांधकाम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सीडी वर्क करताना ते योग्य पद्धतीने करण्याऐवजी खाली फरशा टाकून त्यावर पुरेसे सिमेंट नसलेले काँक्रीट घालण्यात आले होते. परिणामी सीडी वर्क पूर्ण झाल्यानंतर केवळ एक कारगाडी गेल्यामुळे सीडीवर्कचे बांधकाम कोसळून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

 belgaum

सध्या लोखंडी सळ्या उघड्यावर पडलेला कोसळलेल्या सीडी वर्कचा ढिगारा या ठिकाणी वावर असणाऱ्या नागरिकांसाठी विशेष करून लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे. थोडक्यात जयनगर येथील सदर विकास कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.

Cd work तेंव्हा लोकप्रतिनिधींसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणच्या सीडी वर्कसह गटारीचे बांधकाम लवकरात लवकर दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत. तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.