बेळगाव लाईव्ह : चिकोडी तालुक्यातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराजांच्या ५ जुलै रोजी झालेल्या हत्येची अधिक चौकशी करण्यात येत असून या प्रकरणातील दोन आरोपीना चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या पथकाने हिंडलगा कारागृहातून ताब्यात घेतले.
चिकोडी तालुका रुग्णालयात सदर आरोपींची आरोग्य तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करून अधिक चौकशीसाठी आरोपींची १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली मात्र कोर्टाने सदर आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली.
यासाठी मंगळवारी सकाळी चिक्कोडीचे डीवायएसपी बसवराज यलीगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या पथकाने बेळगावच्या हिंडलगा कारागृहातुन नारायण माळी आणि हसन दलायत या दोन आरोपीना ताब्यात घेतले होते.
पोलीस आरोपींना चिक्कोडी जेएमएफसी कोर्टात हजर करणार आहेत. सदर आरोपींना दोन सीपीआय आणि एका डी आर पथकाच्या सुरक्षेत चिक्कोडीला रवाना करण्यात आले.
दरम्यान चिकोडी पोलीस आरोपींची पोलीस कोठडी घेतल्या नंतर खून का केला त्यांचा उद्देश्य काय होता?आणखी कुणी यात सहभागी आहेत का या सगळ्या अँगलनी तपास करणार आहेत.
चिकोडी न्यायालयाच्या आवारात लोकांची गर्दी , कडक बंदोबस्त : जैन मुनींच्या हत्या प्रकरणातील आरोपींना आज चिकोडी न्यायालयात कडक बंदोबस्तात हजर केले.यावेळी न्यायालयाच्या परिसरात आरोपींना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली. यावेळी चिकोडी डीवायएसपी बसवराज यलीगार यांच्या नेतृत्वाखाली अनेक अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यानी कडक बंदोबस्त ठेवला होता.