बेळगाव लाईव्ह : प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधातून आपल्याच पतीचा काटा काढत पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना मूडलगी तालुक्यातील वढेरहट्टी येथे घडली आहे.
गेल्या पाच – सहा महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकलेले जोडपे काल दीप अमावास्येनिमित्त बनसिद्धेश्वर मंदिरात गेले असता प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याची घटना पुढे आली आहे.
शंकर सिद्धप्पा जगमती (वय २७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रियांका जगमती असे त्याच्या पत्नीचे नाव आहे.
घरच्यांच्या आग्रहास्तव नात्यातच या दोघांचा विवाह करण्यात आला होता. मात्र प्रियांकाचे विवाहबाह्य संबंध असल्याने पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच हा कट रचल्याचे समोर आले आहे.