सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी तर साचले आहेच सर्वत्र नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा दूधसागर जवळ दरड कोसळली आहे. मागील रविवारी दरड कोसळली होती त्यानंतर रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती.
दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ मंगळवारी दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक मंगळवारी सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
दुपारी कॅसलरॉकपासून तिसऱ्या बोगद्याजवळ रेल्वे रूळावर दरड कोसळली आहे. डोंगराचा भाग पूर्णपणे लोहमार्गावर आल्याने माती आणि दगड हटविण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
खात्याकडून दरड बाजूला सारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्याला उशिर लागणार असल्याने कांही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर कांही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
काल अश्या रद्द झाल्या होत्या रेल्वे गाड्या
यशवंतपूर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
• यशवंतपूर वास्को ही ट्रेन हुबळीपर्यंत धावेल.
निजामुद्दीन- वास्को ही ट्रेन बेळगावपर्यंत असेल.
वास्को- निजामुद्दीन ही ट्रेन वळविण्यात आली आहे.